Share

शेतकरी आंदोलन : पंतप्रधान मोदींची संसदेत उच्चस्तरीय बैठक सुरु

Published On: 

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलनाचा आज ७० वा दिवस आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये कृषी कायद्याबाबत अद्यापही तोडगा निघालेला नाही. नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक दिली आहे. शेतकऱ्यांकडून राज्यांमधील तसंच राष्ट्रीय महामार्गावर तीन तासांसाठी चक्का जाम आंदोलन केलं जाणार आहे.

याच पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर संसदेत उच्चस्तरीय बैठक बोलवली आहे . या बैठकीत पंतप्रधान मोदींसोबत गृहमंत्री अमित शहा आणि कृषिमंत्री नरेंद्र तोमर उपस्थित आहेत. यामुळे आता या बैठकीमध्ये नेमका काय तोडगा निघतो आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

याआधी पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, शेतकरी आणि सरकार यांच्यात फक्त कॉलचे अंतर आहे. शेतकरी व केंद्र सरकार यांच्यात संवादाचा मार्ग नेहमीच खुला आहे. ते म्हणाले होते की, ‘कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी सांगितलेली बाब पुन्हा सांगतो. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये एकमत झाले नसले तरी आम्ही शेतकऱ्यांसमोर पर्याय ठेवलेला आहे. शेतकरी आणि सरकार यांच्यात फक्त कॉलचे अंतर आहे.’ अशातच आज होणार्‍या उच्चस्तरीय बैठकीनंतर केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये पुन्हा चर्चा सुरू होऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!