नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी बुधवारी म्हटले की, राहुल गांधी शेतकऱ्यांची माथी भडकावण्याचे काम करत आहेत. शेतकरी आंदोलनावरील प्रश्नावर राहुल गांधींच्या विधानाला उत्तर देताना संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांना रस्त्यावर लढा हवा आहे आणि राहुल गांधी शेतकरी बांधवांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपली पोळी भाजत आहेत. यावेळी संबित पात्रा म्हणाले की, आजच्या पत्रकार परिषदेचे शीर्षक आहे- ‘राहुल, रिहाना आणि रॅकेट’
अभी कुछ देर पहले राहुल गांधी ने प्रेस कॉन्फ्रेंस की और कहीं न कहीं किसान बंधुओं के कंधे पर बंदूक रखकर अपनी राजनीतिक रोटी सेंकने की कोशिश राहुल गांधी जी ने की।
साथ ही साथ पुनः किसानों के माध्यम से लोगों को भड़काने का भी प्रयत्न उन्होंने किया है।
– डॉ @sambitswaraj pic.twitter.com/kjn4wzzsZk
— BJP (@BJP4India) February 3, 2021
राहुल गांधींनी दिल्लीतील प्रचंड फौजफाट्यावरून मोदी सरकारवर नुकतीच टीका केली होती. शेतकरी तुमचे शत्रू आहेत का? असा सवालही त्यांनी केला होता. राहुल गांधींच्या या विधानाला प्रत्युत्तर देताना संबित पात्रा म्हणाले की, “राहुल गांधी म्हणतात कोणीही मागे हटवणार नाही, त्यांचा चर्चेवर विश्वास नाही. राहुलजी, ही एक शेतकरी चळवळ आहे आणि त्यांचे कोणत्याही राजकीय पक्षाशी देणेघेणे खुद्द शेतकऱ्यांनी म्हटले आहे. मग तुम्ही त्यांचे वकील का बनता?”
दुसरीकडे, अमेरिकी पॉप सिंगर रिहानाच्या ट्वीटचा संदर्भ घेत पात्रा म्हणाले की, “राहुलजी, रिहाना आणि मिया खलिफा यांना संसद आणि सर्वोच्च न्यायालयाबद्दलच काहीच माहिती नाही. सर्वांनाच हे ठाऊक आहे. राहुल गांधी असोत वा रिहाना दोघांनाही खरीप आणि रब्बीतला फरक कळत नाही. कॅलिफोर्नियात महात्मा गांधींचा पुतळा तोडण्यात आला तेव्हा रिहाना गप्प का होती?”
याशिवाय संबित पात्रा यांनी राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांकडे बोट करून आरोप केला की, ते परदेशात जाऊन भारतविरोधी कुभांड रचणाऱ्यांना भेटतात. भारताविरुद्ध अपप्रचार करू पाहतात. आता यावर काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरेल.
महत्वाच्या बातम्या
- रिहानाविरुद्ध आता बॉलीवूडचा खिलाडी, सिंघम मैदानात, गैरसमज पसरवणाऱ्यांनाही सुनावले खडे बोल
- रिहानाच्या ट्विटवर राहुल गांधींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, दिल्लीतील फौजफाट्यावरून मोदींवर टीका
- प्यायचे होते पाणी, पण चुकून प्यायले सॅनिटायझर; BMCचे सहआयुक्त रमेश पवारांकडून घडली चूक
- ‘तू शांत रहा, आम्ही तुझ्यासारखे मुर्ख नाही’; जगप्रसिद्ध पॉपस्टारला कंगनाच प्रतिउत्तर !
- शरजील उस्मानीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी चंद्रकांत पाटलांचे थेट योगींना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

