मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणू शर्मा यांनी अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली होती. यामुळे धनंजय मुंडे अडचणीत आले होते. मात्र, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बडे नेते धनंजय मुंडे यांच्या पाठीशी ठाम उभा राहिले असल्याने धनंजय मुंडे यांना अभय मिळणार हे स्पष्ट झाले होते.
धनंजय मुंडे यांच्यावर अत्याचाराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं आहे. यासंदर्भात पोलिसांना त्यांनी लेखी लिहून दिलं आहे. गेल्या काही काळापासून तिची बहिण आणि मुंडे यांच्यात सलोख्याचे संबंध नव्हते. त्यामुळे ती मानसिक दबावाखाली होती, असं रेणू शर्माने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे. त्यानंतर मुंडे यांच्यावरील संकट टळले असल्याचे स्पष्ट झाले होते.
मात्र, आरोप करणाऱ्या तरुणीने तक्रार मागे घेतली असली, तरी मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता धनंजय मुंडे यांच्याविरोधात करुणा शर्मा यांनी बुधवारी मुंबई पोलीस आयुक्तांकड़े मुंडेविरोधात तक्रार करत गेल्या तीन महिन्यापासून मुंडे यांनी त्यांच्या दोन मुलांना चित्रकूट येथील त्यांच्या बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यात १४ वर्षाची मुलीचा समावेश देखील आहे. ती सुरक्षित नसल्याचे तक्रारीत नमूद केले आहेत. शिवाय, पोलिसांनी सहकार्य न केल्यास २० फेब्रूवारीपासून आमरण उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला आहे.लोकमतने या संदर्भात वृत्त दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- रिहानाविरुद्ध आता बॉलीवूडचा खिलाडी, सिंघम मैदानात, गैरसमज पसरवणाऱ्यांनाही सुनावले खडे बोल
- रिहानाच्या ट्विटवर राहुल गांधींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, दिल्लीतील फौजफाट्यावरून मोदींवर टीका
- रस्ता रोको किंवा इतर विरोध प्रदर्शनात सहाभागी झाल्यास सरकारी नोकरी मिळणार नाही
- ‘तू शांत रहा, आम्ही तुझ्यासारखे मुर्ख नाही’; जगप्रसिद्ध पॉपस्टारला कंगनाच प्रतिउत्तर !
- शरजील उस्मानीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी चंद्रकांत पाटलांचे थेट योगींना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
