मुंबई : मुंबई वगळता उर्वरित राज्यात आता ५ वी ते १२ वीच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. सुरुवातीला ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करण्यात आले होते. यानंतर, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संमतीने पाचवी ते आठवीचे वर्ग देखील सुरु केले आहेत. तर दुसरीकडं, महाविद्यालये मात्र अद्याप सुरु करण्यात आलेले नाहीत.
उच्च शिक्षणाचे महाविद्यालये नेमके कधी सुरु होणार याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम असून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अखेर याबाबत भाष्य केलं आहे. येत्या १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरु होणार असल्याची माहिती सामंतांनी दिली आहे. टप्प्या-टप्प्याने महाविद्यालये सुरु होणार असून ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे निर्बंध घालण्यात आले आहे.
दरम्यान, विद्यापीठांच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा अद्याप झालेल्या नाहीत. कॉलेज प्रत्यक्षरित्या सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता परीक्षा ऑफलाईन की ऑनलाईन ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक विद्यार्थी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात यासाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे. यावर देखील उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे.
‘परीक्षा या विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने घेण्यात यावी अशी चर्चा विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत झालेल्या बैठकीत झाली होती. परीक्षा या ऑफलाईन व ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने घेण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार परीक्षा पद्धतीचा निर्णय हा विद्यापीठांवर सोपवण्यात आला आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांना कॉलेज हे ऑफलाईन(प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन) व ऑनलाईन, जे विद्यार्थ्यांच्या सोयीचे असेल त्याची व्यवस्था करण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत. तर, कॉलेजमध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना किमान ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य असते. मात्र, यंदा हे निर्बंध नसणार आहेत. याबाबत उदय सामंत यांनी माहिती दिली आहे. तसेच, यूजीसीच्या नियमांनुसारच कॉलेज सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचे देखील त्यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- भारताच्या ‘या’ क्रिकेटपटूचे ‘आयसीसी- मेन्स-प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी नामांकन
- तुम्ही आमच्या भ्रष्टाचारी नेत्यांना विकत घेऊ शकता पण निष्ठावंतांना नाही ; ममता बॅनर्जी यांचा भाजपला टोला
- ‘…तर अजित पवार बारामतीतसुद्धा फिरू शकणार नाहीत’
- ‘तू शांत रहा, आम्ही तुझ्यासारखे मुर्ख नाही’; जगप्रसिद्ध पॉपस्टारला कंगनाच प्रतिउत्तर !
- ‘आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही, हिंदूविरोधी वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

