मुंबई : आर्यन खानच्या अटकेपासून मुंबईत सुरू झालेले ड्रग्ज प्रकरण दिवसेंदिवस चिघळत चालल्याचे चित्र बघायला मिळत आहे. तसेच त्यामध्ये रोज नवनवीन खुलासे होत आहे. त्यातच काल(६ नोव्हें.)भाजपाचे नेते मोहीत कंबोज यांनी या प्रकरणावरून महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर टीका केली. यावर उत्तर देत मोहित कम्बोज या प्रकरणाचा सूत्रधार असून समीर हा वानखेडेचा साथीदार आहे असे मलिक यांनी म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर आता मोहित कम्बोज यांनी या आरोपांना प्रत्तुत्तर दिले आहे.
यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधतांना मोहित म्हणाले की,’नवाब मलिक यांनी ज्या हॉटेल व्यवसायाचा उल्लेख केला आहे तो माझा नाही. त्यांचे आरोप खोटे आहेत. ते दुसऱ्यांचे व्यवसाय माझे असल्याचे सांगत आहेत. सुनील पाटीलसोबत बोलणे झाल्याचे त्यांनी मान्य केले. जसे जसे त्यांच्याबाबत खुलासे होत आहेत तसे ते खोटे आरोप करत आहेत. त्यांनी ११०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. मी २०१४ साली निवडणूक लढलो. ३५० कोटींची संपत्ती असल्याचे मी स्वतः सांगितले. मी कोणता घोटाळा केला आहे याची माहिती घेऊन या. मी वर्षाला पाच कोटींचा कर भरतो. मी मलिक आणि त्यांच्या मुलांप्रमाणे काही लपवत नाही. हे आरोप करुन ते माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मी तुम्हाला घाबरत नाही.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’एका महिन्यापूर्वी त्यांनी आरोप केल्यानंतर त्याच्यावर मी मानहानीचा दावा दाखल केला आहे. जेवढे ते आरोप लावत आहेत त्याच्याविरुद्ध मी हायकोर्टात जाणार आहे. त्यांनी सुनील पाटील आणि सॅम डिसूझाचे काय संबंध आहेत ते लोकांना सांगावेत. मलिक गोष्टी लपवत आहेत. या गोष्टीपासून लांब पळण्यासाठी एखाद्यावर वैयक्तिक आरोप ते करत आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आरोप केले होते’, असेही मोहित यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोदी है तो मुमकिन है, हे अशा वेळी खरं वाटतं’, संजय राऊतांचा हल्लाबोल
- आरोप करणारा फक्त पळूनच गेला नाही, तर त्याने आरोपच नाकारले; राऊतांचं ‘रोखठोक’ भाष्य
- …या कैचीतच महाराष्ट्राचा विरोधी पक्ष अडकून पडलाय- संजय राऊत
- ‘अशाने भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा बेकायदेशीर कृत्य करण्याचा आत्मविश्वास वाढतोय’
- ‘वीरप्पन गँगचा अजून एक कारनामा’, संदीप देशपांडेंनी पोस्ट केला व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

