Share

…या कैचीतच महाराष्ट्राचा विरोधी पक्ष अडकून पडलाय- संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मागील काही दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडी सरकार आणि भाजपा यांच्यात आरोप-प्रत्यारोपाची मालिका बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सामनामधील आपल्या रोखठोक या सदरामधून शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

भाजपाकडून सातत्याने राज्यातील सरकार पाडण्याविषयी केलेल्या दाव्यांवरून राऊत म्हणाले की,’भाजपाला राज्यातलं सरकार कोणत्याही परिस्थितीत घालवायचंय. पण सरकार घालवण्याची ही कुठली अलोकशाही पद्धत? नागपुरातून काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले ‘आठेक दिवसांत सरकार पाडू असं नागपुरातले भाजपावाले बोलतायत. सरकार पाडू आणि सरकार पडेल या कैचीतच राज्यातला विरोधी पक्ष अडकून पडला आहे’, असेही ते म्हणाले.

दरम्यान, पुढे अनिल देशमुख यांच्या अटकेवरून भाजपाला सुनावत राऊत म्हणाले आहेत की,’हवेतल्या आरोपांवर केंद्रीय तपास यंत्रणा राज्याच्या गृहमंत्र्यांना अटक करते आणि पुढच्या २४ तासांत हेच परमबीर सिंग महाशय चांदिवाल आयोगासमोर सांगतात की अनिल देशमुखांविरोधात माझ्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. आरोप करणारा फक्त पळूनच गेला नाही, तर त्यानं आरोपच नाकारले. देशमुख कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय केंद्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात आहेत आणि भाजपा त्याबद्दल जल्लोष करते. ही मनमानी, मस्तवालपणा आणि विकृत तानाशाही आहे’,असेही त्यांनी लेखात नमूद केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!