Share

आज अडीच वर्षानंतर ठाकरे सरकारचे रिपोर्ट कार्ड येणार ; मोहित कंबोज यांचे सुचक ट्वीट

Published On: 

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान झाले. या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. मतदान संपले आहे. आता काही तासांत निकाल जाहीर होणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान झाले. या निवडणुकीत भाजपने 5 तर महाविकास आघाडीने 6 उमेदवार उभे केले आहेत. भाजपने चार ऐवजी पाच तर काँग्रेसने एका ऐवजी दोन उमेदवार उभे केले. त्यामुळे एकून जागेपेक्षा एक उमेदवार जास्त असल्याने दहाव्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते मोहित कंबोज यांनी सुचक ट्वीट केले आहे.

ठाकरे सरकारकडे सध्याचं 143 बहुमत आहे का? लवकरच कळेल. या महाविकास आघाडी सरकारला 2.5 वर्षे पुर्ण झाल्यानंतर आज आज उद्धव ठाकरे सरकारला किती मते मिळतात ते पाहूया! आज अडीच वर्षानंतर ठाकरे सरकारचे रिपोर्ट कार्ड येणार असल्याचे मोहित कंबोज म्हणाले.

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीचा निकाल काही वेळातच लागणार आहे. दुपारी 4 वाजता 285 आमदारांनी मतदान पूर्ण केले. सायंकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार होती. पण काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाला मेल करून भाजपच्या दोन आमदारांच्या मतांवर आक्षेप नोंदवला आणि ही मते रद्द करण्याची मागणी केली. काँग्रेसच्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने बैठक सुरू केली. यानंतर निवडणूक आयोगाने काँग्रेसची तक्रार फेटाळून लावली.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!