Share

“आज तुम्ही असता तर…”, ‘जीव माझा गुंतला’ फेम मल्हारची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ‘जीव माझा गुंतला’ ही मालिका अनेक घरांमध्ये लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेमधील अंतरा आणि मल्हार या दोघांची जोडी घराघरात प्रसिद्ध आहे. या मालिकेमध्ये मल्हारची भूमिका अभिनेता सौरभ चौगुले साकारताना दिसत आहे. सौरभने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या पोस्टच्या आता सगळीकडे चर्चा सुरू आहेत.

‘जीव माझा गुंतला’ मालिकेमधील अभिनेता सौरभ चौगुले याने ‘फादर्स डे’च्या निमित्ताने भावूक होऊन एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून शेअर केली आहे. सौरभने गळ्यातील पेंडेटचा फोटो शेअर करत त्याला एकदम हटके कॅप्शन दिले आहे. त्याबरोबर त्याने पेंडेटची आणि आजोबांची आठवण देखील सांगितली आहे.

सौरभची इंस्टाग्राम पोस्ट –

“खूप लोकांनी विचारल की माझ्या गळ्यात कसल pendant आहे. तर ही माझ्या आजोबांची signature. मम्मीने गिफ्ट केलेलं. पुलिस मध्ये होते मी 3 वर्षांचा होतो तेव्हापासुन आमच्याच सोबत होते. लाड ते शिव्या खात इथे पोहचलो. आयुष्य कसं जगायचं ते त्यांनी शिकवल. पप्पा आजोबा ज्यांना मी कायम पप्पा बोलत आलो. ते माझ्या पप्पांचे पप्पा, confusion कायम होतच नक्की कोणाला हाक मारतोय किंवा कोणाबद्दल बोलतोय ह्याच. मग ठरलं घाटकोपरचे पप्पा म्हणजे “आजोबा”.

“चुरा ke दिल मेरा गोरीया चली” वर थिरकणारे. नशिबवान होतो की तुम्ही खूप काही शिकवलं आज आयुष्यात तीच शिकवण घेऊन पुढे जातोय. माणसं, नाती आयुष्यात किती महत्त्वाची असतात ते शिकलो. Gratitude तुम्ही शिकवलं. तेव्हा कधी इतकं seriously ऐकलं नाही पण आज जेव्हा गोष्टी कळायला लागल्या तेव्हा तुमची उणीव मात्र जाणवते. आज पण कायम तुमचे पाया पडून कामाला सुरवात करतो.आशिर्वाद तर कायम आहेतच पण तुम्ही शिकवलेले काही गोष्टी आजपण मी माझ्या सोबत घेऊन चालतो.

मम्मीला माहितीये की तुम्ही आमच्या किती जवळ आहात. म्हणून मम्मी ने हे बनवुन दिलं. आजपण तुम्ही वेळोवेळी मला मार्ग दाखवतात. आज तुम्ही असता तर नक्कीच माझा नातू ह्या सिरियल मध्ये आहे म्हणून गाव भर फिरला असता. मिस यू घाटकोपरचे पप्पा. आज फादर्स डे सगळे आपल्या बाबांना बदल लिहत होते म्हंटलं आज आजोबांन बदल लिहाव. तुमचा नातू – सौरभ”, असे सौरभने पोस्ट शेअर करत म्हटले आहे. आता सौरभची इंस्टाग्राम पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/Ce_G-5Cjw-a/

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!