🕒 1 min read
मुंबई : राज्यसभेतील पराभवानंतर आज होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी देखील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजप (BJP) यांच्यात थेट लढत होत आहे. या निवडणुकीच्या मतदानाला सकाळी ९ पासून सुरुवातही झाली आहे. महाविकास आघाडीपुढे आपले सहाही उमेदवार निवडून आणण्याचे मोठे आव्हान आहे. मात्र या निवडणुकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (Congress) नाना पटोले (Nana Patole) यांनी मविआचा विजय निश्चित होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
तसेच पुढे विधान परिषदेच्या निवडणुकीत संख्याबळाच्या आधारे निकाल महाविकास आघाडी सरकारच्या बाजूनेच लागेल, आमचा कोटा ठरवून आम्ही समीकरण योग्य जुळवलं आहे. मतांच्या समीकरणाचा फायदा महाविकास आघाडी सरकारच्या सहाव्या उमेदवाराला होणार आहे. असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
आज विधानभवनाबाहेर माध्यमांशी बोलताना नाना पटोलेंनी विरोधकांवर देखील निशाणा साधला. विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये खरी लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्ये असल्याचे दिसून आले, भाजपने आपली ताकद पणाला लावली आहे. तरी महाविकास आघाडी सरकारने देखील आपले समीकरण योग्य जुळवलं आहे, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
