Share

मोदींकडून ‘रडी’चा डाव! भावूक झाल्यानंतर ‘या’ व्हिडिओने केली मोदींची पोलखोल

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आपला लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील डॉक्टरांशी संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधलेल्या या संवादादरम्यान मोदींना भावना अनावर झाल्या. कोरोनाने झालेल्या मृत्यूंमुळे मोदी भावूक झाले असल्याचे यावेळी पाहायला मिळाले आहे. कोरोनाशी दोन हात करताना आपण या लढाईत अनेक जवळच्या लोकांना गमावलं आहे, असं मोदी म्हणाले. डॉक्टरांसोबत बोलताना मोदींचा हुंदका दाटला होता.

दरम्यान, यानंतर आता मोदींच्या भाषणाचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्र्यानं त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून मोदींच्या गुजरातमधील एका भाषणाचा काही भाग शेअर केला आहे. गुजरातमधील सूरत या ठिकाणी पंतप्रधान मोदींनी २०१९ मध्ये एका सभेला मार्गदर्शन केले होते. यावेळचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत मोदी हे ‘रडत राहणं काहींचा स्वभाव असतो. माझा न रडण्यावर विश्वास आहे, ना रडवण्यावर विश्वास’ असं म्हणताना दिसत आहेत.

काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अरूण यादव यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘रडत राहणं काहींचा स्वभाव असतो. माझा न रडण्यावर विश्वास आहे, ना रडवण्यावर विश्वास आहे असं नरेंद्र मोदी म्हणत आहेत. मग त्यांनी मगरीचे अश्रू का काढले. देशाच्या जनतेला याचं उत्तर हवं आहे’ असं ते म्हणाले.

त्यापूर्वी आम आदमी पार्टीने जारी केलेल्या अधिकृत पत्रकामध्ये संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल व्यक्त केलेली शक्यता खरी ठरली आहे. राज्यसभेतील आपचे खासदार असणाऱ्या संजय सिंह यांनी १७ एप्रिलच्या एका मुलाखतीमध्ये व्यक्त केलेलं भाकित २१ मे रोजी खरं ठरलं, असं आपने म्हटलं आहे.

१७ एप्रिल रोजी दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय म्हणाले होते की, ‘अजून थोडा दिवस वाट पाहा. ते (पंतप्रधान मोदी) तुमच्यासमोर येतील. ते फक्त त्यांच्या लाईट्स आणि कॅमेरासाठी वाट पाहत आहेत. ते टीव्हीवर रडतील आणि देशभरातील वृत्तवाहिन्या पंतप्रधान कशापद्धतीने भावूक झाले आणि रडू लागले यासंदर्भातील बातम्या चालवतील,” असं म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!