🕒 1 min read
नवी दिल्ली: प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी रेडिओ कार्यक्रम मन कि बात मधून देशवासियांशी संवाद साधत असतात. यामध्ये ते देशात सुरु असलेल्या अनेक विषयांवर बोलत असतात. यावेळी या कार्यक्रमाच्या 74 व्या एपिसोडचं प्रसारण झाल.
यावेळी नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सर्वांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा. आपल्याला भारताच्या वैज्ञानिकांबद्दल माहिती असणं आवश्यक विज्ञान म्हटलं तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र यांच्यासाऱख्या विषयांपर्यंत मर्यादित विचार केला जातो. आपल्याला याचा आवाका वाढवावा लागेल. आंध्र प्रदेशातील व्यंकट रेड्डी यांनी ड जीवनसत्त्वाचं मुबलक प्रमाण असलेल्या गव्हाचं पीक घेतलं. आपल्याला अशा प्रकारे संशोधन करावं लागेल. गुजरातमधील एका शेतकऱ्याने शेवग्याच्या शेंगांच्या चांगल्या दर्जाचं उत्पादन घेतलं. शेती क्षेत्रात विज्ञानाचा प्रयोग करावा संशोधन करण्यासाठी शास्त्रज्ञ असण्याची आवश्यकता नाही. असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमा आधी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत ‘राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्विट केले होते. ‘हिम्मत है तो करो – #KisanKiBaat #JobKiBaat’, असे ट्विट करत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना आव्हान दिले होते.
महत्वाच्या बातम्या
- धूम स्टाईलने दोन व्यापाऱ्यांना १५ लाखांना लुटले
- कुंबळेंचा विक्रम मोडण्याची संधी ; अश्विन म्हणतो, “फार पुर्वीच रिकॉर्ड्सचा विचार करणं सोडलं”
- वेगवेगळ्या घटनेत मारहाण
- कंपनीतून केबल चोरणाऱ्या चौघांना पोलिस कोठडी
- धक्कादायक! न्यायालयात अर्ज देण्यासाठी आलेल्या व्यक्तिचा आत्महत्येचा प्रयत्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
