Share

धक्कादायक! न्यायालयात अर्ज देण्यासाठी आलेल्या व्यक्तिचा आत्महत्येचा प्रयत्न

Published On: 

जालना : न्यायालयात अर्ज देण्यासाठी आलेल्या विष्णू गिरी या व्यक्तिने घरगुती वादामुळे टोकाचे पाऊल उचलत न्यायालयाच्या आवारात विष प्राशन केले. शनिवारी न्यायालयात अले असता त्यांना समजले की न्यायालय बंद होते. शनिवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास जिल्हा सत्र न्यायालयात ही घटना घडली.

जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यात राहणारा विष्णू गिरी आणि त्यांची पत्नी यांच्यात मागील अनेक दिवसापासुन वाद सुरु होता. या वादामुळे विष्णू गिरी यांची पत्नी मागील अनेक दिवसापासून माहेरी राहत होती. पत्नीने नांदायला यावे याकरीता तो नेहमी सासरी जात होता. मात्र सासरची मंडळी त्रास देतात अशी त्याची तक्रार होती. सदर व्यक्तिची प्रकृती चांगली असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली

शनिवारी विष्णू गिरी आपल्या सासरच्या मंडळीची तक्रार करण्यासाठी थेट न्यायालयात आला. मात्र शनिवारी न्यायालयाचे कामकाज बंद असल्याचे समजताच त्याने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. न्यायालय परिसरातील नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहचत विष्णूला शासकीय रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी पोलिस निरिक्षक यशवंत बागूल, सहायक पोलिस निरिक्षक संभाजी वडते यांनी भेट दिली

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!