औरंंगाबाद : कंपनीतून तीन लाख ४८ हजार रुपयांचे केबल चोरल्याप्रकरणी करमाड पोलिसांनी आणखी चौघांना गुरुवारी दि.२५ रात्री अटक केली. आरोपींना रविवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रुहिना अंजूम यांनी दिले.
मंगेश शेषराव गायकवाड (वय २२), सुमीत संजय शेळके (वय २२, दोघे रा. कुंभेफळ), संतोष अशोक जाधव (वय २१, रा. भेंडाळा ता. गंगापुर) आणि अंकुश भरत खरात (वय २२, रा. दाभाडी ता. बदनापुर, जि. जालना) अशी आरोपींची नावे आहेत.
सिंधी कॉलनीत राहणारे सागर मोहनदास तोलवानी (वय ३७) यांची शेंद्रा एमआयडीसी येथे २०१४ पासून सदगुरु पावर फेल्क्स केबल नावाची कपंनी आहे. कंपनीतून तीन लाख ४८ हजारांचे केबल चोरट्यानी चोरुन नेली व कंपनीच्या मशीनची तोडफोड करुन नुकासन केले. ही बाब २५ जानेवारी रोजी तोलवानी यांच्या निदर्शनास आली. प्रकरणात करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
- दुधाच्या दरात झाली ‘एवढी’ वाढ, पण ग्राहकांचे नुकसान नाही तर शेतकऱ्यांना फायदा
- आदित्य ठाकरेंकडून युकेतील अधिकारी गिरवणार मराठीचे धडे
- कोरोनामुळे शाळा बंद , विद्यार्थीनींच्या हक्काचा ‘रुपयाही’ शासनाने नाकारला
- ‘एवढी प्रेमळ पत्नी असताना कोण डिप्रेशनमध्ये जाईल’ ; विराटच्या ‘त्या’ नैराश्यावर भारतीय दिग्गजाची प्रतिक्रिया
- आता गाठा अवघ्या चार तासात पुणे; मध्य रेल्वेचे पथक उद्या शहरात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

