औरंगाबाद : जुन्या भांडणाच्या कारणावरून जावयाने सासूला मारहाण केल्याची घटना छावणी भागात घडली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून नितीन भानुदास अव्हाड, आकाश भानुदास अव्हाड (रा. लालमाती, मठ मंदिर, भावसिंगपूरा) याच्या विरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत रिक्षा पुढे घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर रिक्षाचालकाने एसटी महामंडळाच्या बसचालकास शिवीगाळ करून लाकडी दांड्याने मारहाण केली होती. ही घटना २६ पेâब्रुवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास हर्सूल टी पॉर्इंट येथे घडली होती. याप्रकरणी बसचालक संतोष मच्छिंद्र जाधव (वय ४०, रा.भिमनगर, भावसिंगपुरा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून रिक्षा क्रमांक (एमएच-२०-ईपी-५४११) चा चालक कृष्णा दादाराव उसरे (वय २८, रा.जाधववाडी) याच्याविरूध्द सिटीचौक पोलिस ठाण्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसऱ्या घटनेत जिन्सी परिसरातील त्रिवेणीनगरात राहणाNया तक्रारदार महिलेला तिच्या पतीने शिवीगाळ करून फायबरच्या खुर्चीने मारहाण केली. ही घटना २५ पेâब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पंकज बाबुराव मोटे (वय २६, रा.त्रिवेणीनगर) यांच्याविरूध्द जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दुधाच्या दरात झाली ‘एवढी’ वाढ, पण ग्राहकांचे नुकसान नाही तर शेतकऱ्यांना फायदा
- आदित्य ठाकरेंकडून युकेतील अधिकारी गिरवणार मराठीचे धडे
- कोरोनामुळे शाळा बंद , विद्यार्थीनींच्या हक्काचा ‘रुपयाही’ शासनाने नाकारला
- ‘एवढी प्रेमळ पत्नी असताना कोण डिप्रेशनमध्ये जाईल’ ; विराटच्या ‘त्या’ नैराश्यावर भारतीय दिग्गजाची प्रतिक्रिया
- आता गाठा अवघ्या चार तासात पुणे; मध्य रेल्वेचे पथक उद्या शहरात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

