Share

कुंबळेंचा विक्रम मोडण्याची संधी ; अश्विन म्हणतो, “फार पुर्वीच रिकॉर्ड्सचा विचार करणं सोडलं”

Published On: 

अहमदाबाद : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. भारताच्या दुसऱ्या डावात सर्वाधिक धावा अश्विनने आपल्या नावावर केल्या. पण त्याचबरोबर अश्विनने अजून एका विक्रमाला गवसणी घातली आहे. अश्विनने आपलाच एक विक्रम मोडी काढल्याचे पाहायला मिळाले. चेन्नईच्या मैदानात यापूर्वी अश्विनने सर्वाधिक ६७ धावा केल्या होत्या. त्यावेळी प्रतिस्पर्धी संघ इंग्लंडचाच होता.

इंग्लंडविरुद्ध २०१६ साली झालेल्या कसोटी सामन्यात अश्विनने ६७ धावांची खेळी साकारली होती. पण दुसऱ्या सामन्यात अश्विनने आपलाच विक्रम मोडीत काढला. आणि नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. अश्विनच्या या खेळीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

नुकत्याच भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याने ४०० कसोटी विकेट्सचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे भारतीय दिग्गज अनिल कुंबळेंना पछाडत त्याला सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज बनण्याची संधी आहे. याबद्दल अश्विनने महत्त्वपुर्ण वक्तव्य केले आहे.

अशात कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या विक्रमात अव्वलस्थानावर ताबा मिळवण्यासाठी अश्विनला फक्त २१८ विकेट्सची गरज आहे. जर त्याने एवढ्या विकेट्स घेतल्या; तर तो कुंबळेना मागे टाकत भारतीय कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज बनेल.

याविषयी अश्विनला विचारले असता तो म्हणाला की, ‘तसे तर मी या विक्रमापासून फक्त २१८ विकेट्स दूर आहे. परंतु मी फार पुर्वीच अशा विक्रमांबद्दल विचार करणे सोडून टाकले आहे. माझ्यासाठी हे विक्रम जास्त महत्त्वाचे नाहीत. तर मी गोलंदाजीत अजून काय करू शकतो, मी अजून उत्कृष्ट कसा बनू शकतो, माझ्या संघासाठी मला अजून काय करता येईल, या गोष्टींचा मी जास्त विचार करतो. कारण जेव्हाही एखादा खेळाडू संघात परत येतो, विशेषकरुन मी आता फक्त कसोटी क्रिकेट खेळत आहे; तर माझे हे कर्तव्य आहे की मी संघात महत्त्वाचे योगदान दिले पाहिजे.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!