पुणे : लोकसभेत बोलताना देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांमुळेच कोरोना वाढला आहे असा घणाघात केला होता. मोदी यांच्या या कोरनाविषयक वक्तव्यावरून महराष्ट्र राज्यभरात अनेक पडसाद पहायाला मिळाले.
नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्यावरून पुणे शहर काँग्रेसने पुणे शहराचे खासदार गिरीश बापट यांच्या घराबाहेर आंदोलन केले. नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी या करता भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. काँग्रेसच्या या आंदोलनावर खासदार गिरीश बापट प्रतिक्रिया देताना म्हणाले कि, ” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी असं वाटत असेल. तर ते कधीच माफी मागणार नाहीत. काँग्रेसनेच उलट देशाची माफी मागावी.
आज गिरीश बापट पत्रकार परिषदेत बोलत होते. नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात गरिबांसाठी अनेक चांगली काम केली आहेत. मात्र राज्यातील अनेक काँग्रेस नेत्यांनी मुंबई मध्ये कामगारांच्या मनात भीती बसवली.त्यांना रेल्वे स्टेशन वर एकत्र केलं आणि कोरोना पसरवला. त्यामुळे उलट काँग्रेस पक्षानेच महाराष्ट्राची माफी मागावी. नरेंद्र मोदी देशाची माफी आजिबात मागणार नाहीत असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- ‘चंद्रकांत पाटील सारखा मी भविष्यकार नसून भाजीवाला आहे’ – छगन भुजबळ
- पिंपरी- चिंचवड महापालिका भवनासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा ; सत्ताधारी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी
- पुरवठा विभागाच्या आदेशाला डावलून पुन्हा सुरू झाले अवैध बायोडिझेल पंप
शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांचा चरणजित सिंग चन्नी यांच्यावर निशाणा म्हणाल्या…
- “….पुरावे असतात तेव्हा वाझे आणि अनिल देशमुख होतो”, भातखळकरांचा संजय राऊतांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

