Share

पिंपरी- चिंचवड महापालिका भवनासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा ; सत्ताधारी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी

Published On: 

पिंपरी : येत्या काहीच दिवसात महाराष्ट्र राज्यातील १० महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. ज्या ज्या महानगरपालिकेत निवडणुका होणार आहेत त्या त्या शहरात राजकीय वादंगाने वेग पकडला आहे.

सध्या पिंपरी – चिंचवड महापालिकेत पण सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेला राष्ट्रवादी या दोघांच्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली आहे. त्यातच आज पिंपरी- चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पिंपरी- चिंचवड मनपा भावनावर भव्य मोर्चा काढत सत्ताधारी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो, भ्रष्टाचारी सत्ताधारी भाजप चले जाव, अश्या प्रकारच्या  घोषणा देण्यात आल्या. पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपच्या भ्रष्ट कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने ‘चले जाव भाजप’ हे आंदोलन आज केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या आंदोलनात हजारो कार्यकर्ते जमा झाले होते. शहरातील अनेक बड्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सत्ताधारी भाजपला आम्ही सत्तेतून खाली खेचू असा आत्मविश्वास दाखवला आहे. चिंचवड स्टेशन येथून मोर्चाला सुरुवात झाली. महापालिकेसमोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो, भ्रष्टाचारी सत्ताधारी चले जाव, आदी घोषणा देण्यात आल्या. राष्ट्रवादीच्या या मोर्च्यामुळे शहरातले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!