नवी दिल्ली : सध्या देशातील ५ राज्यात विधानसभेच्या निवडणुकांचा हंगाम सुरु आहे. मणिपूर, गोवा, उत्तराखंड, उत्तरप्रदेश आणि पंजाब या ५ राज्यात विधानसभेसाठी निवडणूका होणार आहेत. गोवा आणि उत्तराखंड या २ राज्यात निवडणुका झाल्या आहेत तर बाकीच्या तीन राज्यात निवडणुका होणार आहेत.
सगळ्याच राज्यात निवडणुकांच्या प्रचाराने वेग पकडला आहे. त्यातच पंजाबचे मुखमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी पंजाबमध्ये काँग्रेसचा प्रचार करत असताना ”यूपी -बिहारी भय्यांना आपल्या राज्यात येऊ देणार नाही असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावर प्रतिक्रिया देताना आज शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या कि,” यूपी-बिहारचे लोकही भारतीय आहेत, त्यामुळे त्यांची खिल्ली उडवणं बंद करा” असा संताप व्यक्त करत त्यांनी पंजाबचे मुखमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्या भगाओ यूपी-बिहार के भय्या को’ या वक्तव्याचा समाचार घेतला. प्रियंका चतुर्वेदी यांनी आज ट्विट करताना ” देशातील अनेक राजकीय पक्ष युपी आणि बिहारचा विकास करण्यास अपयशी ठरले आहेत. त्यामुळे ज्या लोकांना रोजगार शोधायचा असतो ते लोक बाहेरच्या राज्यात स्थलांतरित होऊन रोजगार शोधायचा प्रयत्न करत असतात .
विदेशात जाण्यासाठी उत्सुक असलेल्या भारतीयांसारखेच हे आहे. या दोन राज्यात आलेली सरकारे तिथल्या लोकांना रोजगार देण्यास असमर्थ ठरली आहेत त्यामुळे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यातील लोक रोजगार शोधण्यासाठी भारत देशातील इतर राज्यात रोजगार शोधण्यासाठी स्थलांतर करत असतात. ते जिथे जिथे जातात तेथील अर्थव्यवस्थेस ते हातभार लावतात आणि त्या राज्यांना श्रीमंत करतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते भारतीय आहेत त्यामुळे त्यांची खिल्ली उडवणं थांबवावे असे व्यक्त होत शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना धारेवर धरले.
Political parties have failed the people of UP&Bihar that is why those who have a choice they migrate.Just like Indians wanting to go abroad. Successive governments couldn’t give them opportunities&jobs.But when they are in other states they are contributors to their economy. 1/2
— Priyanka Chaturvedi???????? (@priyankac19) February 17, 2022
महत्वाच्या बातम्या :
- …जेव्हा रेल्वेमंत्र्यांनी केला लोकलने प्रवास
- आपलाच मुलगा उमेदवार आहे, हेच विसरले मुलायम सिंह यादव
- “तो माझ्या घरी येणे अविस्मरणीय क्षण होता’; मोहम्मद सिराजचा खुलासा
- “मुख्यमंत्री ठाकरेंनी खुर्ची वाचवण्यासाठी पत्नीशी गद्दारी केली?”, सोमय्यांचा सवाल
- किरीट सोमय्या कोर्लईत येताच तणाव, शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने


