Share

अल्प भू धारक शेतकऱ्यांसाठी आणखीन योजना आणणार-पंतप्रधान मोदी

Published On: 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून ध्वजवंदन करून स्वातंत्र्य दिन सोहळ्यास सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग आठव्या वर्षी लाल किल्ल्यावरून ध्वजवंदन केले आहे. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्यात. देशात आज ८० टक्क्यांपेक्षा अधिक शेतकऱ्यांकडे २ हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. ही देशासाठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लवकरच विशेष योजना आणली जाणार असल्याचे मोदींनी सांगितले.

मोदी आपल्या भाषणात म्हणाले की, देशात ८० टक्क्यांपेक्षा अधिक शेतकऱ्यांकडे २ हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे. सुरुवातील देशांमध्ये ज्या नीती बनल्या त्या छोट्या शेतकऱ्यांना केंद्र स्थानी ठेवून बनल्या नाहीत. त्यामुळे त्यांना लक्षात घेऊन एक निर्णय घेतला जाणार आहे. छोटा शेतकरी देशाचा अभिमान बनावा असा आपला संकल्प आहे.

‘छोटा किसान बने देश की शान’ हा आपला नारा आहे. हे आपले स्वप्न आहे. येत्या काळात आपण शेतकऱ्यांची सामूहिक शक्ती वाढवणार आहोत. शेतकऱ्यांना नव्या सुविधा पुरवल्या जातील. किसान रेल्वे सध्या देशातील ७० पेक्षा अधिक रेल्वे मार्गावरुन धावत आहे. आपण पाहतोय की आपले गाव बदलत आहेत. गेल्या काही वर्षात वीज, रस्ते गावात पोहोचले आहेत. सध्या ऑपटिकल फायबर महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. इंटरनेट गावात पोहोचले आहे. डिजिटल उद्योजक आता गावातही तयार होत आहेत.

भारत सहकारवादावर भर देत आहे. आपल्या परंपरेला ते अनुकूल आहे. ८ कोटींपेक्षा अधिक महिला सेल्फ हेल्प ग्रुपशी जोडल्या गेल्या आहेत. त्यांसाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार आहे. या प्लॅटफॉर्ममुळे त्यांच्या वस्तू देशभरात पोहोचवण्यासाठी मदत होईल, असं ते म्हणाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ आठवडे चालणाऱ्या कार्यक्रमांदरम्यान देशातील विविध भागांना ७५ वंदे भारत एक्स्प्रेसच्या माध्यमातून जोडणार असल्याची माहिती मोदींनी दिली. रेल्वे आणि जलमार्ग वाढवण्याचा निर्धार असल्याचं मोदी यांनी आपल्या भाषणादरम्यान व्यक्त केलं.

सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या चतु:सूत्री च्या माध्यमातून शतप्रतिशत विकास साधता येईल. त्यामुळे कोणीही विसासापासून वंचित राहणार नाही. २०२४ पर्यंत रेशनच्या माध्यमातून, मध्यान आहार योजनेच्या माध्यमातून सर्व गरिबांना तांदूळ फोर्टिफाईड करुन वितरित करण्यात येणार आहे असंही पंतप्रधानांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!