🕒 1 min read
औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे गरीब, कामगार लोक देशोधडीला लागलेत. पण सरकार अजुनही लॉकडाऊन वाढवतच आहे. रिक्षावाल्यांसाठी १५०० रुपयांची मदत जाहीर केली. पण ती आतापर्यंत किती लोकांना मिळाली याची माहिती सरकारनेच द्यायला हवी, असा प्रश्न खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकारला केला आहे.
एमआयएम खा.जलील म्हणाले, की पूर्ण लॉकडाऊन आहे. लोक रस्त्यावर नाहीत. रिक्षा जरी बाहेर निघत असल्या तरी त्यांना प्रवाशी मिळत नाहीत. दिवसभर बसल्यानंतर दोन-तीन प्रवाशी मिळतात. त्याने पोट भरतील का कर्जाचे हप्ते देतील? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे, की टिव्हीवर येताना गरिबांचाही विचार करावा.
लॉकडाऊनच्या काळात प्रशासन मोठ्या व्यापाऱ्यांवर मेहेरबानी करत आहे, तर छोट्या व्यापाऱ्यांना मात्र दंड ठोठावत आहे. शनिवारी गुलमंडीत मिलन मिठाई भांडारचे सील दोन तासांत काढण्यात आले. मात्र, इतर गरीब व छोट्या व्यापाऱ्यांना दंड ठोठावणे, दुकाने सील करण्याची बळजबरी का केली जात आहे. प्रशासनाने छोट्या दुकानांचे सील उघडले नाही तर गरीब छोट्या व्यापाऱ्यांची दुकाने मी स्वत: उघडायला येईल’, असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला.
ते म्हणाले, ‘छोट्या व्यापाऱ्यांच्या दुकानांचे सील काढण्याचे निवेदन आमदार प्रदीप जैस्वाल व मी जिल्हाधिकारी यांना दिले होते. परंतु काही राजकीय नेत्यांनी दुकान उघडण्यास विरोध केला. त्यांना फक्त राजकारणच करायचे आहे. बँकेचे हप्ते फेडू न शकल्याने एका रिक्षाचालकाने आत्महत्या केली आहे. ही गंभीर बाब आहे. खासगी बँका गुंडांकरवी कर्जाचे हप्ते बळजबरीने वसूल करू लागले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘फडणवीसांनी आरक्षणासाठी अमृत महामंडळाची घोषणा केली, पण ठाकरे सरकारने बोऱ्या वाजवला’
- मोदींकडून ‘रडी’चा डाव! भावूक झाल्यानंतर ‘या’ व्हिडिओने केली मोदींची पोलखोल
- छोट्या व्यापाऱ्यांच्या मदतीला धावले खा.जलील, ‘व्यापाऱ्यांवरील कारवाई मागे घ्या, अन्यथा..’
- ‘दहा कोटी द्या, अन्यथा नांदेडचे कलेक्टर ऑफिस उडवून टाकेल!’
- ‘केंद्रावरील आरोपांबाबत कार्यकारी संचालकांचे वक्तव्य कंपनीचे नाही’, सीरम इन्स्टिट्यूटचा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

