🕒 1 min read
मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात खासदार संभाजीराजे भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना चार वेळा पत्रव्यवहार केला. पण अद्यापही भेट मिळाली नसल्याचेही सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केलीये. त्यामुळे मराठा समाजामधून पंतप्रधान मोदी आणि भाजपविरोधात संताप व्यक्त होतोय. त्यानंतर आता आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोदींची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय अमृत महामंडळाकडे मुख्यमंत्री दुर्लक्ष करत असल्याचंही ते म्हणाले.
मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटते. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांची आजपर्यंत संभाजीराजे छत्रपतींशी भेट होऊ शकली नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. तसेच, मराठा आरक्षणाविषयी संभाजीराजे यांनी त्यांचं मत मांडलं आहे. विनायक मेटे यांनीही आपली बाजू मांडली. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी आंदोलन झालं तर भाजपचे कार्यकर्ते त्यामध्ये पक्षाचा झेंडा आणि बॅनर बाजूला ठेवून सहभागी होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आरक्षण नसणाऱ्या, विशेषतः ब्राह्मण समाजासाठी मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी 'अमृत' महामंडळाची योजना आखली होती. पण गेल्या दीड वर्षात महाविकास आघाडीच्या कार्यकाळात अस्तित्वात असलेल्या सगळ्या महामंडळाचा बोऱ्या वाजला आहे. हे तर अस्तित्वात यायचं होतं, त्यामुळे हे पडून आहे. pic.twitter.com/P4C39oZ66V
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) May 24, 2021
पाटील म्हणाले, ‘आरक्षण नसणाऱ्या, विशेषतः ब्राह्मण समाजासाठी देवेंद्र फडणवीस यांनी ‘अमृत’ महामंडळाची योजना आखली होती. पण गेल्या दीड वर्षात महाविकास आघाडीच्या कार्यकाळात अस्तित्वात असलेल्या सगळ्या महामंडळाचा बोऱ्या वाजला आहे. हे तर अस्तित्वात यायचं होतं, त्यामुळे हे पडून आहे.’
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ब्राम्हण, मराठा समाज डोळ्यासमोर ठेवून अमृत महामंडळाची घोषणा केली. त्यानंतर त्याची सर्व फाईल पूर्ण झाली. सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी याबाबत पत्रही लिहिले होते. पण कदाचित कोरोनात व्यस्त असल्याने त्यांनी उत्तर दिले नसल्याचे पाटील त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे हे आता आक्रमक झालेत. येत्या २७ तारखेला ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत. यामुळे मराठा समाजाचं लक्ष संभाजीराजेंच्या भूमिकेकडे असून याआधीच शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी ५ जूनला मोर्चा काढणारच अशी ठाम भूमिका घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदींकडून ‘रडी’चा डाव! भावूक झाल्यानंतर ‘या’ व्हिडिओने केली मोदींची पोलखोल
- छोट्या व्यापाऱ्यांच्या मदतीला धावले खा.जलील, ‘व्यापाऱ्यांवरील कारवाई मागे घ्या, अन्यथा..’
- ‘दहा कोटी द्या, अन्यथा नांदेडचे कलेक्टर ऑफिस उडवून टाकेल!’
- ‘केंद्रावरील आरोपांबाबत कार्यकारी संचालकांचे वक्तव्य कंपनीचे नाही’, सीरम इन्स्टिट्यूटचा खुलासा
- नांदेडच्या महिलेला फेसबूकवरील मैत्री पडली महागात, अमेरिकेतील दोघांनी लाखोंना फसवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

