नवी दिल्ली : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आता मोदींना थेट आव्हान दिले आहे. सोरेन यांनी पंतप्रधान मोदींसोबत कोरोना परिस्थितीवर काय चर्चा झाली ट्विटद्वारे सांगितले आहे. ‘आज आदरणीय पंतप्रधानांनी फोन केला. यावेळी त्यांनी फक्त त्यांची मन की बात केली. त्यापेक्षा त्यांनी कामाची गोष्ट केली असती आणि कामाचं ऐकलं असतं तर फार बरं झालं असतं’, असा टोला हेमंत सोरेन यांनी ट्विटमधून लगावला आहे. झारखंडमध्ये कोरोनाचं संकट निर्माण झालेलं असतानाही केंद्राकडून काहीच मदत झाली नसल्याचा आरोप सोरेन यांनी केला आहे.
श्री @HemantSorenJMM जी शायद अपने पद की गरिमा को भूल गए हैं।#COVID19 से उत्पन्न स्थिति को लेकर देश के PM पर कोई बयान देते समय उन्हें यह नहीं भूलना चाहिए कि इस महामारी का अंत सामूहिक प्रयासों से ही संभव है। अपनी नाकामी छिपाने के लिए अपने मन की भड़ास PM पर निकालना निंदनीय है। https://t.co/AoQbyA3u2e
— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) May 7, 2021
त्यावर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी हेमंत सोरेन यांना उत्तर दिले आहे. “देशाच्या पंतप्रधानांविषयी विधान करताना त्यांनी हे विसरू नये की, केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नाने ही साथीची रोगाची समस्या सोडविली पाहिजे, आपले अपयश लपवण्याचा प्रयत्न करताना पंतप्रधान मोदींवर रोष व्यक्त करणे चुकीचे आहे, अशी नाराजी आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
केंद्र सरकार ने कोरोना संकट काल में जहां ग़रीबों और ज़रूरतमंदों के लिए खज़ाने खोल दिए हैं, वहीं झारखंड सरकार ने, अपने खज़ाने का मुंह बंद कर रखा है।
श्री @HemantSorenJMM जी चाहते हैं कि हर काम केंद्र सरकार करे।
कोरोना से लड़िए, PM से नहीं !@PMOIndia
— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) May 7, 2021
तसेच ‘कोरोना संकटात केंद्र सरकारने गरीब आणि गरजू लोकांसाठी तिजोरी उघडली असताना झारखंड सरकारने आपली तिजोरी बंद ठेवली आहे. हेमंत सोरेन यांना वाटतं की सगळी कामं केंद्रानेच करावीत. कोरोनासोबत लढा पंतप्रधानांशी नाही’ असा टोला आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ट्विटमध्ये लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- धक्कादायक! ‘प्रोटोकॉल’ तोडून झारखंडच्या मुख्यमंत्र्यांकडून मोदींच्या संभाषणाचा मजकूर व्हायरल
- ‘संजय काकडेंवर आता तुरुंगात जायची वेळ आलीये’, ‘त्या’ वक्तव्यावर नवाब मलिक संतापले
- ‘कोरोनाशी लढण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे, एकट्या मोदींना ते अशक्य’, नवाब मलिकांचा टोला
- ‘मोदीसाहेब, बंगालच्या पराभवाचा राग पेट्रोल डिझेलवर का काढताय?’, रुपाली चाकणकरांचा टोला
- औरंगाबादेत हेल्मेट सक्ती प्रकरण, हायकोर्टाकडून पोलिसांची खरडपट्टी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

