🕒 1 min read
मुंबई: ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट आता राजकीय वर्तुळातही चांगलाच गाजत आहे. यावरून भाजप-काँग्रेस वाद सुरु असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. दरम्यान आता छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात रस दाखवला आहे. आम्ही चित्रपट बघू आणि त्यावर प्रतिक्रिया नक्की देऊ. मी आमदारांनाही चित्रपट पाहण्यासाठी आमंत्रित केले आहे.”, असे काँग्रेस नेते तथा छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी म्हटले आहे.
दरम्यान मंगळवारी झालेल्या भाजप संसदीय दलाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरही चर्चा केली आहे. यावेळी मोदी म्हणाले की, ‘चित्रपटात जे दाखवलंय, ते सत्य नेहमीच दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे सत्य दडपण्यासाठी एक इकोसिस्टम काम करते. सत्य समोर आणण्यासाठी असे आणखी चित्रपट बनवले पाहिजेत.’
महत्वाच्या बातम्या:
- शरद पवार आणि संजय राऊतांची बंद दाराआड २० मिनिटे चर्चा!
- Women’s WC 2022: भारतीय संघाने गमावला वर्ल्डकपमध्ये दुसरा सामना; केवळ १३४ धावांवर परास्त
- “सगळ्यांचं पीठ होणार हे नक्की”- चंद्रकांत पाटील
- “काश्मीरची खरी फाईल बाळासाहेब ठाकरेंना माहिती, नुसतं टॅक्स-फ्री…”, संजय राऊतांची टीका
- वीज जोडणीची अंमलबजावणी सुरु; महावितरणच्या कंपन्यांना ‘स्टॉप’ चा आदेश जारी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
