Share

मोदींनी बायबलची प्रत मस्तकी लावली; अंध भक्तांनी आता काय करावे?

Published On: 

मुंबई: युरोप दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी हे पोप यांना भेटण्यासाठी व्हॅटिकन सिटीत गेले. मोदी हे साधारण तासभर पोप यांच्या सहवासात होते. पोप यांनी मोदी यांना पवित्र धर्मग्रंथ बायबल दिला आणि मोदी यांनी अत्यंत श्रद्धेने बायबलची प्रत मस्तकी लावली.मोदींनी दाखवलेल्या या श्रद्धेबद्दल अंधश्रद्धाळू भक्तांना काय म्हणायचे आहे? असा खोचक सवाल करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातून मोदींना टोला लगावला आहे.

आपला हिंदू धर्म हेच तर शिकवितो. स्वधर्माचे संरक्षण तर आपण केलेच पाहिजे, पण परधर्माविषयीही आदरभाव ठेवला पाहिजे. अन्य धार्मिक ग्रंथ मस्तकी लावले पाहिजेत अशीच आपल्या धर्माची शिकवण आहे. मोदी यांनी आपल्या या कृतीतून स्वदेशातील मूलतत्त्ववाद्यांना कठोर संदेश दिला. देशात लोकशाही आहे. देश धर्मनिरपेक्ष आहे, असेच मोदींनी ‘व्हॅटिकन’मधून जगाला कळवले. मोदी हे अचानक नवाज मियाँना भेटतात, पोप महाराजांनाही भेटतात, हे सर्व मोदींना शोभते. दुसरे कोणी हे सद्सदविवेकबुद्धीने केले असते तर हाय तौबा तोबा! राष्ट्र, धर्म, संस्कार, भ्रष्टच झाला असता आणि शुद्धीकरण मोहिमा सुरु झाल्या असत्या. अंध भक्तांनी आता काय करावे, हे मोदींनाच ‘मन की बात’मधून सांगावे लागेल! अशी टीका सामनातून संजय राऊत यांनी केली आहे.

दरम्यान भाजप आणि संघ परिवाराची पोप तसेच व्हॅटिकनविषयी अंतःस्थ मते काहीही असली तरी पंतप्रधान मोदी हे पोप यांना भेटल्यामुळे ही भेट क्रांतिकारक, ऐतिहासिक आणि जगाला दिशादर्शक वगैरे ठरलीच आहे. मोदी-पोप भेटीने गरिबी निर्मूलन होईलच आणि हवामान बदलाच्या समस्येवरही मार्ग निघेल. पोपसाहेबांनी मोदींचे निमंत्रण स्वीकारले आणि ते दिल्लीत येतील. 1999 साली तेव्हाचे पोप दिल्लीत अवतरले होते. तेव्हाच्या पोप यांना सोनिया गांधी भेटल्या म्हणून तत्कालीन भाजपने भलतेच काहूर माजवले होते. असे म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!