Share

‘मोदी राजकारणात नसते तर चित्रपटांमध्ये असते, असो यामुळे चित्रपटांचा तरी फायदा झाला’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आपला लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील डॉक्टरांशी संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधलेल्या या संवादादरम्यान मोदींना भावना अनावर झाल्या. कोरोनाने झालेल्या मृत्यूंमुळे मोदी भावूक झाले असल्याचे यावेळी पाहायला मिळाले आहे. कोरोनाशी दोन हात करताना आपण या लढाईत अनेक जवळच्या लोकांना गमावलं आहे, असं मोदी म्हणाले. डॉक्टरांसोबत बोलताना मोदींचा हुंदका दाटला असल्यचे यावेळी दिसले.

या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना मोदी म्हणाले कि, ‘मी काशीचा सेवक या नात्याने सर्व काशीवासियांचे आभार मानतो. विशेष करुन आमचे डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचारी यांनी जे काम केलंय, ते अतुलनीय आहे. या व्हायरसने आपल्या जवळच्या व्यक्तींना आपल्यापासून हिरावलं. मी त्या सर्वांना श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहानुभूती व्यक्त करतो’ असे म्हणताना देखील त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटून आल्याचे देखील यावेळी पाहायला मिळाले.

यावर आता काँग्रेसने नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. मोदी राजकारणात नसते तर चित्रपटांमध्ये नक्की असते अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी केली आहे. त्यांनी ट्वीट करून मोदींवर टीकास्त्र डागलेले आहे. ‘जे लोक साहेबांना गुजरातच्या दिवसांपासून ओळखतात ते सांगतात की, साहेब राजकारणात नसते तर चित्रपटांमध्ये नक्कीच असते. ते तिथे न गेल्याने चित्रपटांचा फायदा झाला पण, देशाचे नुकसान झालं,’ असं खेरा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!