मुंबई: महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरि (Swami Yatindra Anand Giri) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबद्दल भविष्यवाणी केली आहे. १२ वर्ष नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदी कायम राहतील. १२ वर्ष पंतप्रधान पद भूषवल्यानंतर मोदी दिल्लीच्या राजकारणापासून दूर जातील. असे भाकीत त्यांनी केले आहे.
दरम्यान राष्ट्रवादाच्या नावाखाली देशाचा कारभार चांगल्या पद्धतीने चालवू शकतो अशा सक्षम व्यक्तीकडे मोदी नंतर पंतप्रधान पदाची जबाबदारी देतील. मोदी स्वत: राजकारणामधून संन्यास घेतील. मोदींचा १२ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर योगी आदित्यनाथ हे पुढील पंतप्रधान पद सांभाळतील, असेही स्वामी यतींद्र आनंद गिरि यांनी म्हटले आहे.
दरम्यान यावेळी महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरि यांनी योगी आदित्यनाथ यांचेही कौतुक केले आहे. सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकून योगींनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भविष्यामध्ये योगी हेच पंतप्रधान होतील असे ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- शरद पवार आणि संजय राऊतांची बंद दाराआड २० मिनिटे चर्चा!
- Women’s WC 2022: भारतीय संघाने गमावला वर्ल्डकपमध्ये दुसरा सामना; केवळ १३४ धावांवर परास्त
- “सगळ्यांचं पीठ होणार हे नक्की”- चंद्रकांत पाटील
- “काश्मीरची खरी फाईल बाळासाहेब ठाकरेंना माहिती, नुसतं टॅक्स-फ्री…”, संजय राऊतांची टीका
- वीज जोडणीची अंमलबजावणी सुरु; महावितरणच्या कंपन्यांना ‘स्टॉप’ चा आदेश जारी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

