Share

‘वोटबँकसाठी कॉंग्रेसने जे 70 वर्षात केले नाही, ते मोदींनी ५ वर्षात करून दाखवले’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळात ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जम्मू काश्मीरला दिलेला विशेष दर्जा म्हणजे कलम 370 हटवले आहे. या निर्णयामुळे देशभरातून मोदी सरकारचे कौतुक केले जात आहे. जे कॉंग्रेसला ७० वर्षात जमले नाही ते मोदींनी केवळ ५ वर्षात करून दाखवले असे भाजप नेत्यांकडून बोलले जात आहे. आज हरियाणा येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील अशाच प्रकारचे विधान केले.

यावेळी अमित शहा म्हणाले की, वोटबँकच्या लोभापोटी काँग्रेस सरकार ७० वर्षात जे करु शकली नाही ते मोदी सरकारने अवघ्या ७५ दिवसांमध्ये करुन दाखवले. कलम ३७० रद्द करणे हे खूप मोठे काम होते. सरदार वल्लभभाई पटेल यांचे अखंड भारत हे स्वप्न होते. मात्र त्यामध्ये कलम ३७० अडथळा होता. कलम ३७० हटवण्याचे काम तोच करुन शकतो ज्याच्या मनामध्ये वोटबँकेचा लोभ नसेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच वोटबँकेच्या लोभात पडले नाहीत. त्यांनी नेहमी भारताच्या भवितव्यासाठी निर्णय घेतले.

दरम्यान हरयाणामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जींद येथे रॅली झाली. या रॅली दरम्यान त्यांनी हरयाणा विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. याबाबत शहा म्हणाले की, मागच्या वेळी विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी हरयाणाला आलो होतो. तेव्हा ४७ जागांसह भाजप सरकारची स्थापना झाली होती. यावेळी मी परत आलो आहे. तर मी सर्व जनतेला आवाहन करतो की ७५ जागांसह भाजपचे सरकार स्थापन करा.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!