Share

…तर महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी स्वतंत्रपणे निर्णय घेणार : लक्ष्मण माने

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :  लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहे. अशातच लक्ष्मण माने यांनी आघाडीबाबत मोठ विधान केले आहे.

महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी ‘वंचित आघाडी, काँग्रेस आघाडीने जागा वाटपा संदर्भात सन्मानपूर्वक बोलणी केली नाही तर महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी स्वतंत्रपणे निर्णय घेणार आहे, अस विधान केले आहे. तसेच माने यांनी राज्यातील २८८ विधानसभा लढविण्याएवढी आमची शक्ती नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी निवडून येऊ अशाच जागा आम्ही लढवणार आहोत असाही लक्ष्मण माने यांनी स्पष्ट केले.

पुढे बोलताना माने यांनी ‘पाच ऑगस्टपासून महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी आणि इतर दोन पक्षातील इच्छुकांचे अर्ज मागवण्यात येणार आहेत .त्यानंतर उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील. नऊ तारखेनंतर उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. ज्या ठिकाणी आमची ताकद आहे, अशा ठिकाणांवर आम्ही निवडणूक लढवणार आहोत अस विधान केले.

दरम्यान, लक्ष्मण माने हे आधी वंचित बहुजन आघाडीत होते. परंतु तेथे त्यांचे पक्षातील नेत्यांशी मतभेद झाले. यावेळी त्यांनी पक्षातील इतर नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी या पक्षाची स्थापना केली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसला ४० जागा देण्याची तयारी-आंबेडकर

जय महाराष्ट्र म्हणण्यासाठी मला दोन दिवस सराव करावा लागला : सचिन अहिर

कॉंग्रेस म्हणजे वादळात भरकटलेलं जहाज : गिरीश महाजन

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!