Share

‘काश्मीरमध्ये गुंतुवणूकीसाठी उद्योजक माझ्या मागे लागलेत’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : भारत सरकारने कलम ३७० हटवल्यानंतर सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. जागतिक स्तरावरदेखील भारताच्या या निर्णयाचं स्वागत केले आहे. कारण या निर्णयामुळे काश्मीरमध्ये गुंतुवणूकीला चालना मिळणार आहे. केंद्र सरकारही याबाबत सकारात्मक भूमिका घेत असल्याच दिसत आहे.

याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोठं विधान केले आहे. त्यांनी ‘मी या निर्णयासाठी भरपूर आश्वासक आहे. अनेक उद्योगपतींनी माझ्याकडे काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली. आजच्या घडीला आर्थिक विकास बंद दरवाजा आड होऊ शकत नाही. खुले विचार आणि अर्थव्यवस्था क्षेत्र युवकांना प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मदत करतात. गुंतवणूकीमुळे रोजगार, स्थानिकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.

तसेच कलम ३७० हटवल्यामुळे ‘जम्मू काश्मीरात पर्यटन, शेती, आयटी आणि आरोग्य या क्षेत्रातील गुंतवणूकीला चालना मिळू शकेल. अशा निर्णयामुळे एक आर्थिक घडी राज्याला बसेल ज्यामुळे राज्यातील युवकांचे कौशल्य, मेहनत आणि उत्पादनासाठी चांगले परिणाम घडलेले येणाऱ्या काळात पाहायला मिळतील असंही मोदी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पाकिस्तानचा दहशतवादी मसूद अजहर याने कलम ३७० वर भाष्य करताना ‘कलम ३७० हटवल्यानंतर कश्मीरचे विशेष अधिकार संपले. अंबानी, मित्तल, जिंदाल सारखे हिंदू भांडवलदार संपूर्ण कश्मीर विकत घेतील आणि उद्योगधंद्यातून अमाप पैसा कमवातील. यामुळे मुस्लिम कश्मीरमधून आपले अस्तित्व गमावून बसतील’ असं विधान केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!