मुंबई: शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखामध्ये पंतप्रधान मोदींना खोचक टोला लगावला आहे. मोदींचा चेहरा नसेल तर भाजपातील सध्याचे अनेक नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकांतही पराभूत होतील. मोदी यांना स्वतःचे हे बलस्थान माहीत असल्यामुळेच त्यांनी 2024 च्या तयारीसाठी साहसी पावले टाकायला सुरुवात केली आहे.गुजरातमध्ये तर सारी जमीन उकरून किडकी झाडे मुळापासून उपटून टाकली. मध्य प्रदेश, हिमाचल, हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांवर मोदी-नड्डांचे बारीक लक्ष आहे. मोदींनी गुजरातेत सर्वच बदलले. या धसक्यातून पक्षाला सावरायला वेळ लागेल व हाच प्रयोग त्यांची सरकारे नसलेल्या प्रदेशांतही होऊ शकतो. ”मोदी है तो मुमकीन है” म्हणायचे ते इथे! असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी डॉ. नड्डा आल्यापासून पक्षात सतत फेरबदल होत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या मनात आहे ते डॉ. नड्डा यांच्या माध्यमातून करून घेतले जात आहे. नड्डा यांच्याच माध्यमातून उत्तराखंड व कर्नाटकचे मुख्यमंत्री बदलले गेले. गुजरातचे मुख्यमंत्रीही एका खटक्यात बदलले. तेथे तर संपूर्ण मंत्रिमंडळच नवेकोरे करून टाकले. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे प्रथमच आमदार झालेले नेते, पण आता मोदी-नड्डांनी असा धक्का दिला की, राजकारणात काहीच अशक्य नाही.
मोदी किती जबाबदार व त्यांच्या अवतीभवतीचे लोक किती कारणीभूत हे समजून घेण्याची वेळ मोदी-नड्डांवर आली व त्यातूनच गुजरातपासून उत्तराखंडपर्यंत स्वच्छता मोहीम त्यांना हाती घ्यावी लागली. गेल्या काही महिन्यांत एक आसाम सोडले तर प. बंगाल, तामीळनाडू, केरळात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. असेही सामनात म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- काल मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान अन् आज जयंत पाटील आणि फडणवीस एकाच गाडीत
- राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, काहीही चमत्कार होऊ शकतो – विखे
- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ रुग्णालयात; बॉम्बे हॉस्पिटलमध्ये सुरु आहेत उपचार
- पंजाब कॉंग्रेसमध्ये भूकंप; नेतृत्वाच्या बदलाच्या चर्चांना आले उधाण
- ‘मुख्यमंत्र्यांनी ‘ते’ विधान बीकेसीतील पूल दुर्घटनेवरून लक्ष हटवण्यासाठी दिले?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

