मुंबई : शेतकरी आंदोलन एका बाजूला सुरु असताना दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारने बळीराजाला मोठे गिफ्ट दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी शुक्रवारी दुपारी 12 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येणारी आर्थिक मदतीचा पुढील हप्ता जारी केला आहे.
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत पाठवली जाते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक बटण प्रेस करून 9 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवली आहे. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी ही आर्थिक मदत जारी करण्यात आली आहे.
दरम्यान शेतकऱ्याला कठीण काळात मदत करणाऱ्या केंद्र सरकारवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने हल्ला चढवला आहे.हे सरकार शेतकऱ्यांचा मान करत नाही. सर्व काही पैशाने विकत घेता येत नाही. शेतकऱ्यांना पैसे नकोत. न्याय हवा आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.
केंद्रातील सरकार असंवेदनशील आहे. गरीब शेतकऱ्यांचा हे सरकार सन्मान करत नाही. शेतकऱ्यांवर अन्यायच करत आहे. जे धोरण सरकारने आणलं आहे. त्यावर योग्य चर्चा करण्याची गरज आहे, असं सांगतानाच देशात अस्वस्थता वाढत आहे. शेतकरीही अस्वस्थ आहेत. त्यांना पैसे नको आहेत. त्यांना न्याय हवा आहे. सर्व काही पैशाने विकत घेता येत नाही. माणसाचा स्वाभिमान तर नाहीच नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दरम्यान, खा.सुळे यांच्या या मागणीचा आणि टीकेचा खा. प्रीतम मुंडे यांनी समाचार घेतला आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांना न्याय तर दिलाच आहे मात्र त्याच बरोबर पैसा, त्यांच्या उत्पादनाला हमीभाव आणि शेतकऱ्यांची सुरक्षा देण्यात मोदी सरकार यशस्वी ठरले आहे, अशा शब्दात खासदार प्रीतम मुंडे यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. बीडमधल्या संवाद अभियानामध्ये सहभागी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रीतम मुंडे यांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला.
महत्वाच्या बातम्या
- फक्त एका क्लिकवर ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी झाले जमा
- ‘शेतकऱ्यांचे खरेखुरे तारणहार… मोदी सरकार… बाकी सगळे बोल बच्चन देणार’
- नाताळचा सण सर्वांच्या जीवनात उत्तम आरोग्य घेऊन येवो – अजित पवार
- पद्मावत नंतर संजय लीला भन्साळी यांचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवर्यात…
- कोरेगाव भीमा: जयस्तंभाजवळील गावांमध्ये 30 डिसेंबरपासून 4 दिवस संचारबंदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
