मुंबई : देशात कोरोनाचा कहर सुरु असताना देखील गेल्या सहा महिन्यांपापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये अनेकदा चर्चा झाली असून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असलेले पाहायला मिळत आहे.
कोरोना संकटकाळात संयुक्त किसान मोर्चाने नव्या कृषी कायद्यांविरोधात आज देशभरात काळा दिवस साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. कारण आज कृषी कायद्यांच्या विरोधातील शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाले आहेत. अशातच शेतकऱ्यांनी सर्व देशवासियांना या आंदोलनाला समर्थन करण्याचं आवाहन केलं असून तसेच आपल्या घरांवर आणि वाहनांवर काळे झेंडे लावून पाठिंबा दर्शवण्यास सांगितलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसनं कृषी कायद्यांवरून केंद्र सरकारला खडे बोल सुनावले आहेत. ‘नवीन कृषी कायदा करायचा असेल तर चर्चेच्या माध्यमातून करता येतो. केंद्र सरकारने मंजूर केलेले जाचक कृषी कायदे मागे घेऊन तात्काळ शेतकऱ्यांशी बोलले पाहिजे. एखादा विषय प्रलंबित ठेवणे किंवा शेतकरी थकून आंदोलन संपेल हा केंद्राचा गैरसमज आहे,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी हल्लाबोल केला आहे.
या आंदोलनाला राष्ट्रवादीसह अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे लोकांनी काळी फित लावून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला विरोध दर्शवावा असे आवाहन नवाब मलिक यांनी केले आहे. याचबरोबर केंद्र सरकारने जे कृषी कायदे केले आहेत. त्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. शेतकरी या कायद्यांविरोधात 6 महिने आंदोलन करत आहेत. त्यामुळे केंद्राला शेतकरी विरोधात आहेत, हे कळले पाहिजे आणि केंद्र सरकारने कायदे मागे घेतले पाहिजेत, असे नबाव मलिक यांनी म्हटले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- कुणाच्या बापामध्ये मला अटक करण्याची हिंम्मत नाही-बाबा रामदेव
- ‘बारा बलुतेदारांना आर्थिक मदत करावी’, ओबीसी काँग्रेसची मागणी
- मागासवर्गीय पदोन्नतीचा आदेश रद्द करण्यात यावा, वंचित बहुजन आघाडीची मागणी
- डॉक्टरांविषयी ‘ते’ वक्तव्य अंगलट; IMA कडून बाबा रामदेव यांना १ हजार कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस
- ‘तुम्ही तज्ज्ञ नाहीत, रुग्णांच्या जिवाशी खेळू नका’, व्हेंटिलेटर प्रकरणावरून खंडपीठाने नेत्यांना सुनावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

