Share

कुणाच्या बापामध्ये मला अटक करण्याची हिंम्मत नाही-बाबा रामदेव

Published On: 

नवी दिल्ली : उत्तराखंड ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’नं योगगुरू बाबा रामदेव यांना तब्बल १ हजार कोटींची मानहानीची नोटीस धाडलीय. रामदेव यांनी ‘अॅलोपॅथी’ संदर्भात केलेल्या वक्तव्यांवरून आयएमए नाराज आहे. येत्या १५ दिवसांत योगगुरु रामदेव यांनी लेखी माफी मागवी तसंच व्हायरल झालेल्या वक्तव्यांबद्दल प्रतिवाद करणारा व्हिडिओ पोस्ट करावा, अशी मागणी आयएमएकडून करण्यात आलीय. रामदेव यांनी माफी न मागितल्यास त्यांच्यावर १००० कोटींचा दावा दाखल केला जाईल, असे सांगण्यात आलेय.

मात्र, याच दरम्यान आता बाबा रामदेव यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ‘कुणाच्या बापामध्ये हिंम्मत नाही मला अटक करण्याची’ असे बाबा रामदेव या व्हिडिओत म्हणताना दिसत आहेत. ट्विटरवर काही दिवसांपूर्वी बाबा रामदेव यांना अटक करा अशा आशयाचे ट्रेंड सुरू होते, त्यावर बाबा रामदेव म्हणत आहेत की, कुणाच्या बापामध्ये हिंम्मत नाही मला अट करण्याची. अनेक लोकांनी quit ramadev, thug ramdev असे ट्रेंड चालवले, या ट्रेंडमध्ये पण आपण टॉपवर होतो असे म्हणत बाबा रामदेव यांनी टाळ्या वाजवल्या. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, आयएमए उत्तराखंडचे प्रदेश सचिव डॉ. अजय खन्ना यांच्याकडून मंगळवारी रामदेव यांना सहा पानांची नोटीस धाडण्यात आलीय. रामदेव यांच्या वक्तव्यामुळे आयएमए उत्तराखंडशी निगडीत दोन हजार सदस्यांची मानहानी झाल्याचं, त्यांनी या नोटिशीत म्हटलंय. एका डॉक्टर सदस्याच्या मानहानिसाठी ५० लाख यानुसार एकूण एक हजार कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करण्यात येईल, असा उल्लेख त्यांनी आपल्या नोटिशीत केलाय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!