Share

…म्हणून मोदी सरकार पेट्रोलचे दर कमी करणार नाही; पृथ्वीराज चव्हाणांची केंद्र सरकारवर टीका

Published On: 

कोल्हापूर : देशात सध्या पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्या नागरिक घाईला आला आहे. राजकीय नेते मोदी सरकारवर या मुद्द्यावरुन टीका करताना दिसतात. याच मुद्द्यावरून आता काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. तसंच केंद्र सरकार हे दर कमी करणार नसल्याचंही म्हटलं आहे. कोल्हापुरात आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

केंद्राने पेट्रोलवरील कर कमी केल्यास राज्य सरकारही त्यावरील कर कमी करेल, त्यामुळे पेट्रोलचे दर कमी होऊ शकतात. मात्र सध्या पेट्रोलचे कर हेच केंद्राच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत झाले आहे. त्यावरच सध्या पगारापासून ते विकास कामापर्यंत सर्वकाही खर्च भागवला जात आहे. यामुळे सध्याची भारताची हालाखीची आर्थिक परिस्थिती पाहता पेट्रोलचे कर कमी करतील अशी शक्यता वाटत नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

100 कोटी लोकांना लस दिल्याची सध्या जाहिरातबाजी सुरू आहे. पण देशात फक्त 30 कोटी लोकांना लशीचे दोन्ही डोस दिलेले आहेत. हे प्रमाण देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत केवळ २१ टक्के आहे. जगाच्या तुलनेत लस देण्यात भारत 144 व्या क्रमांकावर आहे, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!