🕒 1 min read
मुंबई: न्यूयॉर्क टाईम्सने (New York Times Pegasus news )केलेल्या दाव्यानुसार २०१७ मध्ये मोदी सरकारने संरक्षण सौद्याच्या पॅकेजमध्ये इस्त्रायलकडून पेगासस खरेदी केले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान यावरच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP leader Jitendra Awhad) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
“१ बिलियन डॉलर म्हणजे ७५०० करोड. २ बिलियन डॉलर म्हणजे १५ हजार करोड. इतक्यासाठी सांगतोय की, देशातील टॅक्सपेयर लोकांचा एवढा पैसा मोदी सरकारने पेगासस हे राजकीय हेरगिरी करणारे सॉफ्टवेअर घेण्यासाठी वापरला आहे, असे न्यूयॉर्क टाइम्सचा रिपोर्ट आहे.”, असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
1 बिलियन डॉलर म्हणजे
7500 करोड.
2 बिलियन डॉलर म्हणजे 15 हजार करोड.
इतक्यासाठी सांगतोय की,
देशातील टॅक्सपेयर लोकांचा एवढा पैसा मोदी सरकारने Pegasus हे राजकीय हेरगिरी करणारे सॉफ्टवेअर घेण्यासाठी वापरला आहे,अस न्यूयॉर्क टाइम्सचा रिपोर्ट आहे.#Pegasus— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 29, 2022
दरम्यान, मार्च २०२० मध्ये राज्यसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना अशा प्रकारचे तंत्रज्ञान खरेदी केल्याची माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे उपलब्ध नसल्याचे उत्तर त्या खात्याच्या मंत्र्यांनी दिले होते. आता न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. तर यावरूनच विरोधी पक्षाने आता भाजपवर निशाणा साधण्यास सुरु केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- राज्यपाल नियुक्त १२ आमदारांसाठी उदय सामंत यांचा पुढाकार; म्हणाले…
- तंत्रज्ञानाचा वापर आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी अॅमेझॉनची मदत घेणार- वर्षा गायकवाड
- पेगासस प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले,‘आम्ही सातत्याने पार्लमेंटमध्ये…’
- बापरे! विजयानंतर खेळाडूचे रक्तरंजित सेलिब्रेशन ; व्हिडीओ होतोय व्हायरल
- भाजप देशातील सर्वात मोठा पक्ष असल्याने कार्यकर्त्यांची संपत्ती जास्त असणारच-प्रविण दरेकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
