🕒 1 min read
मुंबई: राज्यातील सर्व शासकीय शाळांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षणाचा दर्जा उंचावला जावा यासाठी अॅमेझॉनचे सहकार्य घेतले जाणार आहे. प्रशिक्षण, अभ्यासक्रम तयार करण्यासाठी सूचना करणे यासाठी ॲमेझॉनने सहकार्य करण्यास तयारी दर्शविली असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड (Minister of School Education Prof. Varsha Gaikwad) यांनी दिली आहे.
या निर्णयाची सुरुवात प्रातिनिधीक स्वरूपात टॅब वितरण करून झाली. यासंबंधी वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत राज्यात ४८८ आदर्श शाळांमधील विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वितरण, संगणकशास्त्रातील कोडिंग लॅब, ॲमेझॉनच्या मुलींच्या शिष्यवृत्तीमध्ये अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थिनींचा समावेश करण्याची तयारी, सर्व शासकीय शाळांमधील शिक्षकांना तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, पुणे येथे सायन्स सिटीच्या उभारणीमध्ये तंत्रज्ञानाची मदत, केंद्र सरकारच्या सूचनेनुसार नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत २०२२ पासून तंत्रज्ञान आधारित अभ्यासक्रम तयार करण्यासाठी मदत करणे, प्रशिक्षण देणे याकार्यासाठी ॲमेझानची मदत घेतली जाणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
दरम्यान शालेय शिक्षण विभागातर्फे डिजिटाईज्ड वर्ग केले जाणार आहेत. यामध्ये देखील ॲमेझॉनची मदत घेतली जाणार आहे. याची सुरुवात म्हणून मुंबईतील धारावी येथील महानगरपालिकेअंतर्गत शाळांमधील ७६९ विद्यार्थ्यांना टॅब दिले जाणार आहेत. असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- कोरोनाच्या लाटेबद्दल राजेश टोपे म्हणाले, राज्यात तिसऱ्या लाटेचा पीक…
- “जनाब संजय राऊत झिंग झिंग झिंगाट झाले आहेत”, गोपीचंद पडळकरांची टीका
- खा. सुप्रिया सुळेंचे श्री संत तुकाराम महाराजांना साकडे, संस्थान अध्यक्षांशी केली चर्चा
- राज्यात निर्बंध शिथील बाबत आरोग्यमंत्र्यांची महत्वपूर्ण माहिती
- अनिल देशमुखांची पाठराखण करणारे शरद पवार आता काय बोलणार?- केशव उपाध्ये
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
