मुंबई : न्यूयॉर्क टाईम्सने केलेल्या दाव्यानुसार २०१७ मध्ये मोदी सरकारने संरक्षण सौद्याच्या पॅकेजमध्ये इस्त्रायलकडून पेगासस खरेदी केले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळत आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संजय राऊत म्हणाले की,‘न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानंतर सत्य समोर आले आहे. पेगासस प्रकरणी आम्ही सातत्याने पार्लमेंटमध्ये प्रश्न विचारत आहोत. या मुद्यावरुन संसद चालू दिली नाही. आमच्या बँक खात्याच्या व्यवहारांची माहिती देखील घेतली जाते, आणीबाणीपेक्षाही भयंकर परिस्थिती देशामध्ये आहे, लोकशाही कुठे आहे?’, असा सवालही राऊतांनी केला आहे.
दरम्यान, मार्च २०२० मध्ये राज्यसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना अशा प्रकारचे तंत्रज्ञान खरेदी केल्याची माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे उपलब्ध नसल्याचे उत्तर त्या खात्याच्या मंत्र्यांनी दिले होते. तद्पश्चात आता न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
महत्वाच्या बातम्या:
“अनिल देशमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची अनधिकृत यादी पाठवत होते”, सीताराम कुंटेंचा गंभीर आरोप
“दूध का दूध म्हणणाऱ्या अनिल देशमुखांमागे खरे सूत्रधार कोण?”, अतुल भातखळकरांचा सवाल
‘मास्कमुक्त महाराष्ट्र’ चर्चेवर अजित पवारांनी दिले स्पष्टीकरण; म्हणाले…
‘ठाकरे सरकारचा वसुलीचा धंदा…,’ कुंटेंनी केलेल्या खुलास्यानंतर सोमय्यांचे टीकास्त्र
“वाईन विक्रीचा निर्णय संजय राऊत शेतकरी हिताचा सांगताहेत, जनता एवढी दुधखुळी नाही”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

