Share

बापरे! विजयानंतर खेळाडूचे रक्तरंजित सेलिब्रेशन ; व्हिडीओ होतोय व्हायरल

Published On: 

मुंबई : खेळामध्ये संघ विजयी झाल्यानंतर खेळाडू अनेक प्रकारे विजय सेलिब्रेट करतात. त्यात नाचणे, मैदानभर फिरणे अशा प्रकारचे सेलेब्रेशन होत असते. मात्र सध्या वेगळ्याच सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात त्या खेळाडूच्या नाकातोंडातून रक्त येतोय मात्र तो हसत हसत संघाचा विजय सेलिब्रेट करत आहे.

बिग बॅश लीगचा हा व्हिडीओ असल्याचे समोर आले आहे. ज्यात पार्थ स्कॉचर्स या संघाने सिडनी सिक्सर्सला ७९ धावांनी पराभूत केले. ज्याचा विजय सेलिब्रेट करताना जे रिचर्डसन यांच्या नाकाला कॉलिन मनरोचा खांदा लागला. कॉलिन नकळतपणे रिचर्डसनच्या बाजूने आल्याने त्याच्या नाकाला दुखापत झाली आहे. सामना संपल्यानंतर रिचर्डसन असाच रक्तरंजित हास्य करत मैदानावर समालोचकांशी बोलत होता. रिचर्डसचे रक्तरंजित स्थितीत बोलतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पर्थ स्कॉचर्सने चौथ्यांदा बिग बॅश लीगचे जेतेपद मिळवले आहे. स्कॉर्चर्सने सिक्सरला बीबीएल विजेतेपदांची हॅट्ट्रिक करणारा पहिला संघ बनण्यापासून रोखले आहे. स्कॉर्चर्सने याआधी २०१३-१४, २०१४-१५ , २०१५-१६ या तीन वर्षात जेतेपद मिळवले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!