Share

भाजप देशातील सर्वात मोठा पक्ष असल्याने कार्यकर्त्यांची संपत्ती जास्त असणारच-प्रविण दरेकर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणूक लागली आहे. त्याअनुषंगाने देशातील निवडणूक लढवणाऱ्या पक्षांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे. श्रीमंत पक्षांच्या यादीत भाजप देशातील सर्वात श्रीमंत पक्ष सिद्ध झाला आहे. (BJP is the richest political party) देशातील सात राष्ट्रीय पक्षांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे. भाजपची संपत्ती ४ हजार ८४७ कोटी ७८ लाख असून दुसऱ्या क्रमांकावरील बसपाची ६९८ कोटी ३३ लाख असल्याचे जाहीर केले आहे. तर काँग्रेसची संपत्ती ५८८ कोटी १६ लाख रुपये असून काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. यामुळे भाजपवर टीका होत आहे. या टीकाकारांना भाजप नेते तथा विधान परिषदेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

याबाबत प्रविण दरेकर ट्विट करत म्हणाले, ‘भाजपा हा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. अनेक पक्ष रसातळाला जात आहेत, त्यांचा ऱ्हास होताना दिसत आहे, मात्र भाजप हा दिवसेंदिवस समृद्ध होताना दिसत आहे. मोठा पक्ष म्हटल्यावर कार्यकर्त्यांची संपत्ती जास्त असणारच. सभासद जास्त, लोकांची पसंती जास्त याचाचं दुखणं अन्य पक्षांना आहे.’

‘भाजपच्या मागे कार्यकर्त्यांची संपत्ती आहे, जनतेची संपत्ती आणि विश्वास आहे. मात्र या संपत्ती विषयी कोणी बोलताना दिसत नाही. मदत करायला विश्वास लागतो आणि तो विश्वास भाजपने जनतेला दिला आहे.’ असे प्रत्युत्तर प्रविण दरेकरांनी टीकाकारांना दिले आहे.

निवडणुकीवर अभ्यास करणारा गट असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स ADR नुसार, भाजपने २०१९-२० या वर्षात ४ हजार ८४७ कोटी ७८ लाख रुपयांची संपत्ती जाहीर केली, जी सर्व राजकीय पक्षांमध्ये सर्वाधिक आहे. यानंतर बसपने ६९८ कोटी ३३ लाख आणि काँग्रेसने ५८८ कोटी १६ लाख रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. २०१९-२० या वर्षात राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या मालमत्ता आधारित हा अहवाल आहे. या अहवालात सात राष्ट्रीय पक्षांनी घोषित केलेली संपत्ती ६ हजार ९८८ कोटी ५७ लाख रुपये आणि ४४ प्रादेशिक पक्षांनी २ हजार १२९ कोटी ३८ लाख रुपये इतकी आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!