Share

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांसाठी उदय सामंत यांचा पुढाकार; म्हणाले…

Published On: 

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर महाविकास आघाडी सरकार चांगलेच तोंडावर पडले आणि याचा फायदा घेत भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली. आता या पार्श्वभूमीवर राज्यातील राज्यपाल नियुक्त सदस्यांची नियुक्ती व्हावी म्हणून हालचाली सुरू झाल्या आहेत.

राज्य सरकारने विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त सदस्य नेमण्यासाठी नितीन बानगुडे (Nitin Bangude) यांच्या नावाची शिफारस केली आहे. मात्र दोन वर्ष झाले तरी नियुक्ती होत नसल्याने आता बानगुडे कोर्टात दाद मागणार आहेत. कायदे तज्ज्ञांशी चर्चा करून ते कोर्टात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आता राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आता राज्यपाल नियुक्त १२ आमदारांसाठी पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) म्हणाले, राज्य सरकारने विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त सदस्य नेमण्यासाठी नितीन बानगुडे यांच्या नावाची शिफारस केली आहे. मात्र दोन वर्ष झाले तरी नियुक्ती होत नसल्याने आता बानगुडे कोर्टात दाद मागणार आहेत. तसेच या संदर्भात कोर्टात पिटीशन दाखल करता येते का, याबाबत कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं. तसेच कायदे तज्ज्ञांशी मी वैयक्तिक चर्चा करणार आहे. त्याचा राज्य सरकारशी काहीही संबंध नाही, असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!