Share

‘मोदी सरकारमुळे देशात सर्व संकल्प पूर्ण होण्याचा सुवर्णकाळ सुरू’

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : काँग्रेसने केंद्रात व राज्यात सत्तेत असताना गरिबांच्या भावनांशी खेळ केला. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबीचे भांडवल न करता गरिबी हटविण्यासाठी अंत्योदय योजनेचा नारा दिला. भाजप सक्षम पक्ष हा कार्यकर्त्यांच्या बळावर असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्यासाठी कार्यकर्त्यांनी वज्रमूठ बांधून तयारी केली पाहिजे, असे आवाहन पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी केले.

भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात पंकजा यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, भाजपच्या रूपाने देशात सर्वात मोठे संघटन उभे राहिले आहे. संघटनांच्या माध्यमातून देशभरात भाजपने सत्ता स्थापन केली. मोदी सरकारमुळे देशात सर्व संकल्प पूर्ण होण्याचा सुवर्णकाळ सुरू आहे. कोरोनाकाळात कार्यकर्त्यांनी जनतेची सेवा केली. काँग्रेसने सत्ताकाळात गरिबांच्या भावनांशी खेळ केला. पंतप्रधान मोदींनी गरिबीचे भांडवल माेडीत काढत गरिबी हटविण्यासाठी अंत्योदय योजनेचा नारा दिला. स्थानिक स्वराज्य संस्था ताकदीने लढायच्या आहे. विरोधकांना कमजोर समजू नका. परिवार म्हणून वज्रमूठ करून निवडणुकांना सामोरे जायचे आहे, असेही मुंडे यांनी सांगितले.

दरम्यान, नाशिक मनपाच्या वतीने नव्याने सुरू करण्यात आलेल्या सिटी लिंक बससेवेला केंद्र सरकारकडून नुकताच एक्सलन्स इन अर्बन ट्रान्सपोर्ट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे सातपूरला आलेल्या पंकजा मुंडे, जयकुमार रावल यांच्यासह नाशिक व धुळ्याच्या महापौरांनी सातपूर कॉलनी ते अशोकनगर प्रवास सिटी लिंकच्या बसने केला. यावेळी त्या म्हणाल्या की, पर्यावरणाच्या दृष्टीने अशी सेवा देशभरात सगळीकडे उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!