मुंबई: दाऊद इब्राहीमशी संबंधित मुंबईतील जवळपास २० ठिकाणांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापे टाकले असून भेंडीबाजार नागपाडा, गोरेगाव, मुंब्रा, भिवंडी, सांताक्रुझ येथील एकूण २० ठिकाणांवर छापेमारी करत एनआयएने कारवाई करण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर येत आहे. यावरूनच भाजप नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) यांनी केंद्रातील मोदी सरकारचे कौतुक केले आहे.
“मुंबईत एनआयएने मोठी कारवाई करत नागपाडा, भेंडीबाजारसह २० ठिकाणांवर छापेमारी केली आहे. देशातला आतंकवाद समूळ उखडून टाकण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे. देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणारे कोणताही दहशतवादी गट या कारवाईतून सुटणार नाही हाच मोदी सरकारचा कडक इशारा आहे.”, असे ट्वीट चित्रा वाघ यांनी केले आहे.
मुंबईत एनआयएने मोठी कारवाई करत नागपाडा, भेंडीबाजारसह २० ठिकाणांवर छापेमारी केली आहे.
देशातला आतंकवाद समूळ उखडून टाकण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे. देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणारे कोणताही दहशतवादी गट या कारवाईतून सुटणार नाही हाच मोदी सरकारचा कडक इशारा आहे. pic.twitter.com/ODKoZfrWh1— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 9, 2022
दरम्यान दाऊदच्या संबंधिताकडून चालवण्यात येणाऱ्या दहशवादी जाळ्याची पाळेमुळे खोलण्याचे काम एनआयएकडून सुरु असून यामध्ये संबंधित व्यक्तींच्या मालमत्तांवरही छापे टाकले जात आहेत. त्यामुळे सध्या राजकीय वातावरणही अधिकच तापले असल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022 : अरे बापरे..! दिल्ली कॅपिटल्सचा ‘मुंबईकर’ खेळाडू हॉस्पिटलमध्ये दाखल; पाहा PHOTO!
- ‘दिप-वीर’च्या घरी नव्या सदस्याचे होणार आगमन; रणवीर म्हणाला…
- “मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर…” ; मंत्री अब्दुल सत्तार यांनी नवनीत राणांचे आव्हान स्विकारले
- IPL 2022 : बॅटिंगला जाण्यापूर्वी महेंद्रसिंह धोनी आपली बॅट का चावतो? वाचा कारण!
- राणा दाम्पत्य दिल्लीकडे रवाना; अमित शाहांची घेणार भेट


