खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठणावरुन मोठा गोंधळ घातला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. १२ दिवसात तुरुंगात राहील्यानंतर माध्यमांशी संवाद न साधण्याच्या अटीखाली त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र खासदार नवनीत राणा यांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले आहे.
खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान दिले होते. दरम्यान आता याच आव्हानाला मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्वीकारले आहे.
दरम्यान, न्यायालयाने विरोध केल्यानंतर देखील नवनीत राणा यांनी माध्यमांशी संवाद साधल्यामुळे राज्य सरकार कोर्टात जाण्याची शक्यता आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. प्रसारमाध्यमांशी बोलायचे नाही, पोलिस तपासात अडथळे आणायचे नाहीत, अशा अशा अटी घालण्यात आल्या होत्या. राणा दाम्पत्याने या अटी कबूल केल्या होत्या. मात्र, तुरुंगात बाहेर पडल्यापासून राणा दाम्पत्य पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आग ओकताना दिसत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
