मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. या सामन्यात धोनी फलंदाजीला येण्यापूर्वी आपली बॅट चावताना दिसला. भारताचा माजी क्रिकेटर आणि अनुभवी लेगस्पिनर अमित मिश्राने याबाबत खुलासा केला आहे. ”भारताला दोनदा विश्वचषक जिंकून देणारा धोनी आपली बॅट स्वच्छ ठेवण्यासाठी असे करतो आणि फलंदाजी करताना त्याच्या बॅटवर एकही टेप किंवा धागा दिसत नाही.”
धोनीही दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आपली बॅट चावताना दिसला. या सामन्यात त्याने ८ चेंडूत २१ धावांची नाबाद खेळी खेळली. चेन्नईने दिल्लीवर ९१ धावांच्या फरकाने मोठा विजय मिळवला. ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत अमित मिश्रा म्हणाला, ”जर तुम्ही विचार करत असाल की धोनी अनेकदा त्याची बॅट का खातो. तो त्याच्या बॅटमधून टेप, धागा काढून टाकण्यासाठी असे करतो, कारण त्याला त्याची बॅट स्वच्छ ठेवायला आवडते.”
In case you’re wondering why Dhoni often ‘eats’ his bat. He does that to remove tape of the bat as he likes his bat to be clean. You won’t see a single piece of tape or thread coming out of MS’s bat. #CSKvDC #TATAIPL2022
— Amit Mishra (@MishiAmit) May 8, 2022
असा रंगला चेन्नई-दिल्ली सामना…
आयपीएल २०२२ (IPL 2022)च्या ५५व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिमाखदार पद्धतीने दिल्ली कॅपिटल्सवर (CSK vs DC) विजय मिळवला आहे. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात चेन्नईने दिल्लीला ९१ धावांनी मात दिली. डेव्हॉन कॉनवे-ऋतुराज गायकवाड यांची शतकी सलामी आणि धोनीच्या फिनिशिंग धावांच्या जोरावर टॉस गमावलेल्या चेन्नईने दिल्लीसमोर २०८ धावांचा डोंगर उभारला होता. कॉनवेने ८७ धावांची खेळी करत दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई केली. प्रत्युत्तरात दिल्लीचे स्टार फलंदाज आव्हान पेलू शकले नाहीत. १७.४ षटकात ११७ धावांवर पंतसेना ऑलआऊट झाली.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

