Share

IPL 2022 : अरे बापरे..! दिल्ली कॅपिटल्सचा ‘मुंबईकर’ खेळाडू हॉस्पिटलमध्ये दाखल; पाहा PHOTO!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा मुंबईकर फलंदाज पृथ्वी शॉला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. काल रविवारी (८ मे) चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यापूर्वी पृथ्वीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पृथ्वीने स्वतःचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोमध्ये तो हॉस्पिटलमध्ये बेडवर झोपलेला दिसत आहे. पृथ्वी शॉला खूप ताप होता, त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले.

पृथ्वीने शेअर केलेल्या फोटोत त्याच्या समोरच्या टेबलावर लॅपटॉपही ठेवला आहे. ‘मी रुग्णालयात दाखल आहे आणि सध्या तापातून सावरत आहे. शुभेच्छांबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. मी लवकरच मैदानात परतेन.”, असे पृथ्वीने सांगितले. भारतात खेळल्या जात असलेल्या आयपीएलच्या १५व्या हंगामादरम्यान, कोरोना विषाणूने आपले डोके वर काढले आहे. दिल्ली कॅपिटल्सचे सपोर्ट स्टाफ, काही खेळाडू आणि नेट बॉलरलाही कोरोना झाला होता.

IPL 2022 Delhi Capitals Prithvi Shaw admitted to Mumbai hospital due to high fever
पृथ्वी शॉ

असा रंगला चेन्नई-दिल्ली सामना…

आयपीएल २०२२ (IPL 2022)च्या ५५व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिमाखदार पद्धतीने दिल्ली कॅपिटल्सवर (CSK vs DC) विजय मिळवला आहे. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात चेन्नईने दिल्लीला ९१ धावांनी मात दिली. डेव्हॉन कॉनवे-ऋतुराज गायकवाड यांची शतकी सलामी आणि धोनीच्या फिनिशिंग धावांच्या जोरावर टॉस गमावलेल्या चेन्नईने दिल्लीसमोर २०८ धावांचा डोंगर उभारला होता. कॉनवेने ८७ धावांची खेळी करत दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई केली. प्रत्युत्तरात दिल्लीचे स्टार फलंदाज आव्हान पेलू शकले नाहीत. १७.४ षटकात ११७ धावांवर पंतसेना ऑलआऊट झाली.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!