मुंबई : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला होता. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत होती त्यामुळे आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. परंतु मागील काही दिवसांपासून लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे आणि वाढलेल्या लसीकरणामुळे सध्या तरी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आलेली आहे.
अशा सर्व भीषण परिस्थितीमध्ये सुद्धा महाराष्ट्रातील राजकारण थांबण्याचे चित्र दिसत नाही आहे. आता महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लसीकरणाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. पुलवामाच्या घटनेत पाकिस्तानने आमच्या देशाच्या अनेक सैनिकांना शहीद केले.
अनेक बहिणींच्या कपाळावरचे कुंकू पुसले. त्याच पाकिस्तानच्या लोकांना वाचवण्यासाठी नरेंद्र मोदींनी भारतीयांची लस फुकट दिल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. एवढेच नाही तर थेट न बोलता अप्रत्यक्ष शब्दातच पटोले यांनी मोदींच्या या वॅक्सीन डिप्लोमॅसीचा संबंध पुलवामा दशतवादी हल्ल्याशी जोडून मोदींनी पाकिस्तानला तेव्हा मोफत लस देऊन जणू त्यांचे कर्ज फेडले असे आरोपही केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राहुल गांधींचे ट्विटर ब्लॉक करणे हे जुलमी व्यवस्थेचे प्रतिक’ काँग्रेसचा हल्लाबोल
- ‘डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या सूत्रधारांचे काय झाले?’, अंनिसचा सरकारला सवाल
- आश्चर्यम! राऊतांकडून राज्यपालांचे कौतूक; म्हणाले, ‘ते प्रेमळ, सद्वर्तनी, मनमिळावू, पण..’
- भाजपाचे चाणक्य लागले कामाला, एका बाणातून साधणार दोन निशाणे
- बंदी असतानाही गोपीचंद पडळकरांकडून २० ऑगस्टला बैलगाडा-छकडा शर्यतीचे आयोजन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

