मुंबई : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे ट्वीटरचे खाते निलंबित करण्यातआल्यामुळे सध्या देशातील राजकीय वातावरण चिघळले असल्याचे सध्या तरी पहायला मिळत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉम असणाऱ्या ट्विटरने काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे आणि काही नेत्यांचे अकाऊंट लॉक केले आहे. त्यावर मोठी चर्चा आणि आरोप सुरू आहेत. ट्विटर या मायक्रोब्लॉसिंग साईटने आपले अधिकृत ट्विटर हँडल, तसेच आपले अनेक नेते व कार्यकर्त्यांची ट्विटर खाती तात्पुरती बंद केल्याचा आरोप काँग्रेसने गुरुवारी केला होता.
यावरून काँग्रेसचे नेते नाना पातलो यांनी भाजपवर टीका केली आहे. ते म्हणाले, ‘राहुल गांधींनी दिल्लीच्या त्या ९ वर्ष्याच्या मुलीवर झालेल्या बालात्कारावर बोलतात. राहुल गांधी त्या तीन काळ्या कायद्यांवर बोलतात. तसेच जनतेच्या हिताचे प्रश्न ते मांडतात. तर त्यांचे ट्वीटर खाते बंद केले जाते. हे कृत्य जुलमी व्यवस्थेचे प्रतिक आहे. जर राहुल गांधींचे ट्वीटर खाते सुरु केले नाही. तर देशातील जनता त्यांच्या सोबत उभा राहून नरेंद्र मोदींच्या सरकारला पाडल्या शिवाय राहणर नाही’ असे आव्हान त्यांनी मोदींना केले आहे.
दिल्ली में 9 साल की बच्ची के साथ बलात्कार होता है, उस बच्ची की आवाज बनकर श्री राहुल गांधी जी उस बच्ची को और उसके परिवार को न्याय दिलाने की बात करते हैं। राहुल गांधी का ट्विटर अकाउंट ब्लॉक करना दमनशाही व्यवस्था को बयान कर रहा है: श्री @NANA_PATOLE#SpeakUpAgainstTwitterHypocrisy pic.twitter.com/EEUuCI5EIh
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) August 14, 2021
दरम्यान, कॉंग्रेसने केंद्र देशातील नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान पेगासस ,महागाई, अशा विविध प्रश्नावरून कॉंग्रेसने मोदींना चांगलेच घेरल्याचे दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पुण्यात ‘या’ पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
- आता जाहीर सभांमधून शरद पवारांचे व्हिडीओ लागणार बहुधा – अतुल भातखळकर
- औरंगाबादेत शिवसेना, भाजप, काँग्रेस मनपा निवडणूकीच्या तयारीत व्यस्त; तर ‘राष्ट्रवादी’ अजूनही सुस्तच!
- ‘शरद पवारांनी राष्ट्रवादी स्थापन केल्यानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला’, राज ठाकरेंचा गंभीर आरोप


