Share

राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मोदी-बायडन पाहिल्यांदाच एका मंचावर

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: क्वाड (QUAD) हा भारतासह अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समूह असून यामध्ये स्थानिक मुद्यांसोबतच काही जागतिक समस्यांवरही चर्चा करण्यात येते यावेळी करोना महामारीपासून जलवायु परिवर्तन यांसारख्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ मार्चला होणाऱ्या देशांच्या प्रमुखांच्या पहिल्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक ऑनलाइन होईल, असं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून जो बायडेन आणि मोदी यांच्यातील ही पहिलीच बैठक असेल. यापूर्वी अमेरिकेच्या निवडणुकीनंतर दोघांची फोनवर चर्चा झाली होती. त्यामुळे आता दोन राष्ट्रांचे संबंध कसे विकसित होतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.

यावेळी हिंदी-प्रशांत महासागर क्षेत्रात लसीची सुरक्षा, एकसमान आणि परवडणारी लस यावर चर्चा करतील. करोनावरील चर्चेदरम्यान चीनचा मुद्दा उपस्थित होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या देशांनी करोनाच्या संसर्गासाठी चीनला जबाबदार धरत चीनच्या चौकशीची मागणी केली होती. यामुळे यावेळी चीनविरोधात काही भूमिका घेतली जाते का हे बघणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!