Share

IPL 2022 DC vs PBKS : मॅचला काही तास शिल्लक असताना दिल्लीचा ‘हा’ खेळाडू निघाला कोरोना पॉझिटिव्ह!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा मिचेल मार्श याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांचा पंजाब किंग्जविरुद्धचा (DC vs PBKS) सामना पुण्यातून हलवून आज ब्रेबॉर्न स़्टेडिय़मवर खेळवण्यात येणार आहे. पण या सामन्याला काही तास शिल्लक असताना दिल्लीचा अजून एक खेळा़डू कोरोना पॉझिटिव्ह (Covid 19) आढळला आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, दिल्ली संघाच्या टिम  सेफर्ट या विदेशी खेळाडूला कोरोना झाला आहे. रॅपिड अँटिजेन चाचणीत त्याची चाचणी पॉझिटिव्ह आढळली. आज (बुधवारी) दुपारी ही चाचणी घेण्यात आली. दिल्लीच्या ताफ्यातील हा सहावा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहे. या चाचणीनंतर बीसीसीआय़ मॅचपूर्वी अजून एक चाचणी घेणार आहे.

बीसीसीआयने दिल्ली कॅपिटल्सला कळवले आहे, की ते मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर आज सामना खेळणार असलेल्या खेळाडूंची चाचणी घेणार आहेत. दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंना त्यांच्या रूममध्ये जाण्यास सांगण्यात आले आहे आणि वैद्यकीय पथक त्यांच्या रूममध्ये जाऊन कोरोना चाचणीची व्यवस्था करेल. ज्या खेळाडूंचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत त्यांच्यासोबतच हा सामना खेळवला जाणार असल्याचे समजते. उर्वरित संघ आणि सपोर्ट स्टाफची नंतर चाचणी केली जाईल.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!