मुंबई : विराट कोहली शतक कधी करणार, हा प्रश्न आता जुना झाला आहे. आता चाहत्यांना त्याच्या चांगल्या खेळीची आस लागली आहे. टीम इंडिया आणि आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद सोडल्यानंतरही तो फलंदाज म्हणून त्याच्या उंचीनुसार कामगिरी करू शकलेला नाही. आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या (LSG vs RCB) शेवटच्या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) गोल्डन डकवर बाद झाला. त्यामुळे टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) चिंतेत आहेत. त्याने कोहलीला क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा सल्ला दिला आहे.
रवी शास्त्री यांनी सांगितले, ”विराटमध्ये अजून ६-७ वर्षे क्रिकेट शिल्लक आहे. क्रिकेट खेळण्यासाठी कोहलीवर जास्त जबरदस्ती केली नाही पाहिजे. विशेषत: अशा वेळी जेव्हा जैव-बबल-संबंधित थकवा चिंतेचे कारण बनतो. मी प्रशिक्षक असताना पहिल्यांदाच याची सुरुवात झाली. तेव्हा मी म्हणालो होतो, की खेळाडूंबद्दल सहानुभूती असली पाहिजे. जर तुम्ही आग्रह धरला तर, खेळाडू चांगली कामगिरी करणे आणि हार मानणे यात फारच कमी फरक उरतो. त्यामुळे निर्णय घेताना शहाणपणा दाखवावा लागेल.”
Just ????… not just bcz he got out on 0 but after watching his fake smile….A lot of pain is hidden in this smile.. We can't see him like this yaar ???? ????#RCBvLSG #LSGvsRCB #LSGvRCB #IPL2022 #ViratKohli???? pic.twitter.com/qzSFXca25B
— Sid (@sidiiboi) April 19, 2022
Rohit Sharma and Virat Kohli are yet to score a fifty in IPL 2022 so far????
????: IPL/BCCI pic.twitter.com/CdY7pdgFcw
— CricTracker (@Cricketracker) April 19, 2022
”मी थेट मुख्य खेळाडूबद्दल बोलतो. विराट कोहलीला कंटाळा आला आहे. अशा वेळी कोणाला ब्रेक हवा असेल तर तो कोहली आहे. दोन महिने असो वा दीड महिना, इंग्लंड दौऱ्यापूर्वी असो वा नंतर, पण त्याला विश्रांती द्यायला हवी. कारण कोहलीचे अजून ६-७ वर्षांचे क्रिकेट बाकी आहे आणि सध्याच्या परिस्थितीत आपण त्याला गमावावे असे कोणालाच वाटत नाही. या टप्प्यातून जाणारा तो एकटाच नाही. यावेळी जागतिक क्रिकेटमध्ये आणखी एक-दोन खेळाडू यातून जात असतील. तुम्हाला समस्येचा सामना करावा लागेल.”
आयपीएल २०२२पूर्वी कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद सोडले. तेव्हा तो फलंदाज म्हणून चमकदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली होती. मात्र या मोसमात त्याने ७ सामन्यात केवळ ११९ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

